MPSC Exam Postpone : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी, राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख बदलली

Last Updated:

mpsc prelims exam Date Change: 28 सप्टेंबर रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा आता 9 नोव्हेंबरला होणार आहे.

एमीएससी
एमीएससी
मुंबई  : राज्यातील जवळपास ३० जिल्हे आणि विशेषत: मराठवाडा परिसरातील पूरस्थितीमुळे राज्यसेवा आयोगाची (MPSC) 28 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली होती. आता अखेर विद्यार्थ्यांची ही मागणी पूर्ण झाली आहे. 28 सप्टेंबर रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा आता 9 नोव्हेंबरला होणार आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने एक अर्थी पूरग्रस्त विद्यार्थांना दिलासाच दिला आहे.
दरम्यान, काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक जारी करत विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळत राज्य सेवा आयोगाची परीक्षा ठरलेल्या तारखेप्रमाणेच आणि वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण आता राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर काही अंशी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय विद्यार्थ्यांची आणि सर्व पक्षीय नेत्यांचीही राज्य लोकसेवा आयोगाने मागणी पूर्ण केली आहे.
advertisement
पूरस्थितीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम झाला आहे. वाहतूक व्यवस्था विस्कळीत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे अशक्य होणार आहे. अशा वेळी नियोजित तारखेला परीक्षा न घेता काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. पण आता परीक्षा उमेदवारांच्या आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या मागणीनंतर राज्य लोकसेवा आयोगाने काही वेळापूर्वीच परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे. खरंतर, राज्यातल्या अनेक खासदारांनी आणि आमदारांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
advertisement
अतिवृष्टी झालेल्या भागांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यातल्या इतर पक्षातले नेते जेव्हा गेले होते, तेव्हा अनेक परीक्षा उमेदवारांनी नेत्यांकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. 385 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या पूर्व परीक्षेसाठी राज्यातल्या 37 जिल्ह्यातल्या केंद्रांवर जवळपास 3 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. रविवारी 09 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यामध्ये पूर्व परीक्षा होणार आहे. 385 पदांसाठी 3 लाख विद्यार्थी पूर्व परीक्षेला बसणार आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MPSC Exam Postpone : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी, राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख बदलली
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement