Ashadhi Ekadashi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.अकरा पत्रा शेड भाविकांनी भरले होते. सावळ्या विठुरायाच्या दर्शना नंतर भाविक आनंदी झाले.
advertisement
1/5

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली.
advertisement
2/5
राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, माझा बळीराजा सुखी आणि समाधानी राहू दे, असं साकडं आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
advertisement
3/5
यावेळी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन येथील बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला.
advertisement
4/5
अवघा रंग एक झाला... रंगि रंगला श्रीरंग ||मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या महापूजेनंतर पांडुरंगाचं गोजिरं-सावळं रुप समोर आलंय... न्यूज18 लोकमतच्या माध्यमातून थेट गाभाऱ्यातून तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन घेता येणारेय.. गुलाबी आणि हिरव्या रंगातील वस्त्र, गळ्यात फुलांची माळ, भाळी गोपीचंदन टिळा... असं हे विठुरायाचं हे मनमोहक रुप इतकंच पाहण्याची आस आज सगळ्यांच्या मनी आहे...
advertisement
5/5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या महापूजेनंतर पांडुरंगाचं गोजिरं-सावळं रुप समोर आलंय... न्यूज18 लोकमतच्या माध्यमातून थेट गाभाऱ्यातून तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन घेता येणारेय.. गुलाबी आणि हिरव्या रंगातील वस्त्र, गळ्यात फुलांची माळ, भाळी गोपीचंदन टिळा... असं हे विठुरायाचं हे मनमोहक रुप इतकंच पाहण्याची आस आज सगळ्यांच्या मनी आहे...
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Ashadhi Ekadashi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली