TRENDING:

Bhaubeej: ...म्हणून भाऊबीजेला बहीण करते 'ती' खास प्रार्थना, संबंध थेट यमराजांशी!

Last Updated:
Diwali Special Astrology: अनेकजण वर्षभर दिवाळीची आतुरतेनं वाट पाहतात. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा अत्यंत प्रसन्न असा सण. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनसह वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला पाडवा सण दिवाळीत साजरा होतो. तसंच भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेली भाऊबीजही दिवाळीतच साजरी होते. हा सण जरी अत्यंत प्रेमाचा आणि पवित्र नात्याचा असला तरी, त्याची सुरुवात यमराजापासून झाली होती, हे तुम्हाला माहितीये का? (विकास झा, प्रतिनिधी / फरीदाबाद)
advertisement
1/5
Bhaubeej: ...म्हणून भाऊबीजेला बहीण करते 'ती' खास प्रार्थना, संबंध थेट यमराजांशी!
रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन्ही सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक. भाऊ-बहिणीचं नातं, या नात्यातलं पावित्र्य कायम अतूट राहावं यासाठी हे सण साजरे केले जातात. यावेळी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. कारण या सणाचा संबंधच थेट यमराजाशी आहे.
advertisement
2/5
यमराज म्हणजे मृत्यू, परंतु भाऊबीज या पवित्र सणाची सुरुवातच त्यांच्यापासून झाली. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी गेले होते तेव्हा त्यांनी तिथे लज्जतदार जेवणाचा आस्वाद घेतला. त्यावेळी यमुनेनं त्यांना ओवाळलं. तेव्हापासूनच भाऊबीजेची सुरुवात झाली. म्हणूनच...
advertisement
3/5
भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीत स्नान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नदीत आंघोळ करून बहिणीच्या घरी जाऊन जेवण करावं. मग बहिणीनं भावाला ओवाळल्यास त्याच्या पत्रिकेतला अल्प आयू दोष दूर होतो, अशी मान्यता आहे.
advertisement
4/5
ज्योतिषांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, भाऊबीजेमागे आणखी एक पौराणिक कथा सांगितली जाते. भगवान श्रीकृष्ण नरकासूर राक्षसाचा वध करून आपली बहीण सुभद्रा हिच्या घरी आले. तिथं ते जेवले, मग सुभद्रेनं त्यांना ओवाळलं. म्हणजेच द्वापर युगापासून हा पवित्र सण साजरा केला जातो. ज्योतिषी उमाशंकर मिश्रा यांनी ही माहिती दिली.
advertisement
5/5
सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Bhaubeej: ...म्हणून भाऊबीजेला बहीण करते 'ती' खास प्रार्थना, संबंध थेट यमराजांशी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल