TRENDING:

6 वाजून 48 मिनिटांनी संपणार चंद्रग्रहण, ग्रहण संपताच न चुकता लगेचच करा 'ही' 6 काम!

Last Updated:
भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी आजच्या चंद्रग्रहणाचा 'मोक्ष काळ' म्हणजेच समाप्ती होत आहे. शास्त्रानुसार, ग्रहणाच्या वेळी वातावरणात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा आणि अशुद्धता दूर करण्यासाठी ग्रहण सुटल्यानंतरची वेळ अत्यंत महत्त्वाची असते.
advertisement
1/7
6 वाजून 48 मिनिटांनी संपणार चंद्रग्रहण, ग्रहण संपताच न चुकता करा 'ही' 6 काम!
भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी आजच्या चंद्रग्रहणाचा 'मोक्ष काळ' म्हणजेच समाप्ती होत आहे. शास्त्रानुसार, ग्रहणाच्या वेळी वातावरणात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा आणि अशुद्धता दूर करण्यासाठी ग्रहण सुटल्यानंतरची वेळ अत्यंत महत्त्वाची असते.
advertisement
2/7
शुद्धीकरण: ग्रहण संपताच सर्वात पहिले काम म्हणजे संपूर्ण स्नान करणे. शक्य असल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा मीठ टाकावे. यामुळे ग्रहणादरम्यान शरीरावर पडलेला नकारात्मक प्रभाव आणि सूतक दोष दूर होतो. धुलिवंदन असल्याने अनेकांनी रंगाने खेळले असेल, तरीही ग्रहणानंतरचे हे 'शुद्धीकरण स्नान' अनिवार्य मानले जाते.
advertisement
3/7
घराचे आणि देवघराचे शुद्धीकरण: स्वतःच्या स्नानानंतर संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे. विशेषतः देवघरातील पडदे बाजूला करून मूर्तींना गंगाजलाने अभिषेक करावा किंवा स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. ग्रहण काळात देवदेवतांना 'कष्ट' असतात, अशी धारणा असल्याने त्यांना पुन्हा शुद्ध करणे गरजेचे असते.
advertisement
4/7
नवा स्वयंपाक आणि ताजे अन्न: ग्रहणापूर्वीच्या अन्नात तुम्ही तुळशीची पाने टाकली असतील, तर ते अन्न तुम्ही खाऊ शकता. मात्र, शक्य असल्यास ग्रहण संपल्यावर ताजा स्वयंपाक करावा. ग्रहणापूर्वी शिजवलेले आणि उघड्यावर राहिलेले अन्न फेकून द्यावे किंवा प्राण्यांना द्यावे.
advertisement
5/7
दानधर्माचे महत्त्व: ग्रहण संपल्यानंतर दान केल्याने पुण्याचे फळ अनेक पटीने वाढते. चंद्रग्रहणाशी संबंधित असल्याने पांढऱ्या वस्तूंचे दान करणे श्रेष्ठ मानले जाते. गरजू व्यक्तीला तांदूळ, साखर, दूध, पांढरे कापड किंवा चांदी दान केल्याने कुंडलीतील 'चंद्र दोष' दूर होण्यास मदत होते.
advertisement
6/7
कापूर आणि धूपाचा वापर: ग्रहण संपल्यावर घरामध्ये कापूर जाळावा किंवा उदबत्तीचा धूर सर्व खोल्यांमध्ये दाखवावा. कापराच्या ज्वलनाने वातावरणातील सूक्ष्म जंतू आणि नकारात्मक लहरी नष्ट होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
advertisement
7/7
मंगळ दर्शन आणि आरती: ग्रहण सुटल्यानंतर देवासमोर दिवा लावावा आणि कुलदेवतेची आरती करावी. ग्रहण काळात आपण जो जप केला, त्याचे अर्पण देवाला करावे. यामुळे ग्रहणाच्या काळ सावटातून मुक्त होऊन घरामध्ये पुन्हा मंगलमय वातावरण निर्माण होते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
6 वाजून 48 मिनिटांनी संपणार चंद्रग्रहण, ग्रहण संपताच न चुकता लगेचच करा 'ही' 6 काम!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल