TRENDING:

Shukrawar Upay: शुक्रवारी न चुकता करावे हे 6 उपाय, माता लक्ष्मीच्या कृपेनं वाढेल धन-दौलत

Last Updated:
Shukrawar Upay: आज शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. हा दिवस शुक्र ग्रहाला देखील समर्पित आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, ज्या घरात देवी लक्ष्मी निवास करते आणि तिचा कृपावर्षाव करते, त्या घरात सदैव धन, सुख आणि समृद्धी राहते. यासोबतच कामात यशही मिळते. लक्ष्मी मातेला संपत्तीची देवी म्हटले जाते, तर शुक्राला भौतिक सुख आणि संपत्तीचे कारण मानले जाते. तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल, तिचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल, आर्थिक विवंचना दूर करायची असेल आणि सुख-समृद्धी हवी असेल तर देवीची पूर्ण भक्तिभावाने पूजा करा आणि शुक्रवारी व्रत करा. जाणून घेऊया अशा काही उपायांबद्दल ज्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. यामुळे तुम्हाला अनेक समस्या आणि त्रासांपासूनही आराम मिळू शकतो.
advertisement
1/6
शुक्रवारी न चुकता करावे हे 6 उपाय, माता लक्ष्मीच्या कृपेनं वाढेल धन-दौलत
1. पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला तुमच्या आर्थिक संकटावर मात करायची असेल तर शुक्रवारी तीन मुलींना आपल्या घरी बोलवावं. त्यांना खीर खायला द्यावी. पिवळ्या रंगाचे कपडे दान करा आणि काही दक्षिणा देऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवा. हा उपाय केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते, असे मानले जाते.
advertisement
2/6
2. कमळ हे देवी लक्ष्मीचे आवडते फूल मानले जाते. सकाळी उठून आंघोळ केल्यावर स्वच्छ व पांढरे कपडे घाला. लक्ष्मीची पूजा करून तिच्या चरणी कमळ अर्पण करा. कमळाचे फूल घरातील वाईट आणि नकारात्मक शक्ती दूर करू शकते. घरात माता लक्ष्मी वास करते. प्रगतीचे मार्ग खुले होतात. कमळाच्या फुलाने पूजा केल्याने घर धन-धान्यानं भरलेले राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
3/6
3. या दिवशी जो व्यक्ती काळ्या मुंग्यांना खाण्यासाठी साखर देतो, त्याची सर्व प्रलंबित महत्त्वाची कामे पूर्ण होऊ लागतात. तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम अनेक दिवस अडकले असेल तर सलग अकरा शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखरेचे दाणे टाकावेत, असे करणे खूप शुभ मानले जाते.
advertisement
4/6
4. जर आर्थिक चणचण भासत असेल, घरात नियमितपणे पैसा येत नसेल तर आज देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच गणेशाची पूजा करावी. लक्ष्मीला कमळाची फुले, खीर, बताशा, गुलाब, शंख इत्यादी अर्पण करा. यामुळे धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते, धन आणि संपत्ती वाढू लागते.
advertisement
5/6
5. शुक्रवारी लक्ष्मी स्तोत्राचा पाठ केल्यानं पैशाची कमतरता दूर होते. जीवनात आनंद येतो. तसेच संध्याकाळी घरात अंधार ठेवू नका, कारण यावेळी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. असे मानले जाते की, संध्याकाळी अंधार ठेवल्यानं नकारात्मक ऊर्जा पसरते. याच्या मदतीने लक्ष्मी घरात न जाता परत येऊ शकते. संध्याकाळी 5 वाजल्यापासून घराचा प्रत्येक कोपरा उजळून टाका.
advertisement
6/6
6. ज्योतिष शास्त्रानुसार सकाळी गायीला गूळ मिसळून पोळी खाऊ घाला. माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आशीर्वाद देईल. तुम्हाला आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Shukrawar Upay: शुक्रवारी न चुकता करावे हे 6 उपाय, माता लक्ष्मीच्या कृपेनं वाढेल धन-दौलत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल