TRENDING:

Idli Vada Pav Recipe:वडापाव भारीच...पण 'इडली वडापाव' खाऊन बघितलाय कधी? झटपट रेसिपी

Food

मुंबई : वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण...आणि मुंबईचा वडापाव म्हणजे देश-विदेशातील खव्वयांसाठी पर्वणी. तुम्ही आजवर मुंबईत किंवा मुंबईबाहेर वेगवेगळ्या ठिकाणच्या वडापावची चव चाखली असेल. काही वडापाव भारी लागले असतील, काही वडापाव लय...भारी लागले असतील. पण तुम्ही कधी इडली वडापाव खाल्लाय का? असा वडापावपण असतो? पडला ना प्रश्न? होय, हा पदार्थ चवीला एकदम Yummy लागतो आणि तो तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं बनवू शकता.

Last Updated: December 13, 2025, 18:05 IST
Advertisement

Health Tips : आरोग्यासाठी नैसर्गिक टॉनिक, वजन कमी करायला होईल मदत, बडीशेप खाण्याचे हे फायदे माहितीये का?

छत्रपती संभाजीनगर : आज वाढतं वजन अनेकांसाठी चिंता बनलं आहे. कामाचा ताण, अनियमित आहार आणि बसून राहण्याची सवय या सगळ्यांमुळे वजन नियंत्रणाबाहेर जातं. वजन कमी करण्यासाठी जिम, डाएटिंग अशा अनेक गोष्टी आपण करतो. पण कधी कधी आपल्या घरातील अगदी साध्या वस्तूंमध्येही प्रचंड आरोग्यदायी गुण लपलेले असतात. त्यापैकीच एक म्हणजे बडीशेप. जेवणानंतर तोंडाला सुगंध देण्यासाठी वापरली जाणारी ही छोटीशी दाणे असलेली बडीशेप, खरेतर संपूर्ण आरोग्यासाठी एक नैसर्गिक टॉनिक आहे. विशेषतः वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ती अत्यंत उपयुक्त ठरते.

Last Updated: December 13, 2025, 18:37 IST

पुण्यातील 135 वर्ष जुन्या वाड्यात मिळतोय वडापाव; रस्त्यासमोरून जाताना सुगंधानेच खावासा वाटेल!

Food

पुणे : वडापाव आवडत नाही अशी व्यक्ती सापडणं अवघड आहे. वडापाव आवडतं नाही अशी व्यक्ती सापडणं मुश्किल आहे . वडापावचा जन्म मुंबईत झाला असला तरी संपूर्ण देशात हा पदार्थ तितकाच लोकप्रिय आहे. बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याच्या ऐवजी या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलान तळून बटाटेवडा बनवण्यास सुरूवात झाली. तेव्हापासून वडापाव हा प्रत्येकालाच आपला वाटतो.

Last Updated: December 13, 2025, 17:31 IST
Advertisement

Success Story : 2 एकरमध्ये उभारलं कृषी पर्यटन केंद्र, महिन्याला 4 लाखांची निव्वळ कमाई, शिवाजी यांच्या यशाची कहाणी

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथे शिवाजी धोत्रे यांनी सुरू केलेले निसर्ग फार्म कृषी पर्यटन केंद्र सध्या पर्यटकांचे नवे आकर्षण ठरत आहे. दोन एकरांमध्ये उभारलेल्या या केंद्रावर हुरडा, रानमेवा, भेळ, तसेच चुलीवरचे जेवण अशा पारंपरिक स्वादांची खास सोय आहे. कुटुंबांसह येणाऱ्यांसाठी वेगळा किड्स झोन असल्याने दिवसभर येथे उत्साह पाहायला मिळतो. वाढती गर्दी आणि उत्तम व्यवस्थापनामुळे 30 स्थानिक कामगारांना रोजगार मिळाला आहे. या व्यवसायातून महिन्याला 15 लाखांची उलाढाल तर सुमारे 4 लाखांची निव्वळ कमाई होत असल्याचे शिवाजी धोत्रे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले आहे.

Last Updated: December 13, 2025, 17:05 IST

Titwala- Goveli Accident: रस्त्याच्या बाजूला महिला चालत होती, तितक्यात पाठीमागून भरधाव गाडी आली अन्...

कल्याण नजीक असलेल्या टिटवाळ्यामध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. टिटवाळ्यानजीक असलेल्या गोवेली रोडवर हा काळजाचा थरकाप उडवाणारा अपघात घडला आहे. भरधाव पिकअपच्या धडकेत रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. घडलेल्या घटनेमुळे गावकरी संताप व्यक्त करत आहेत. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओमध्ये हा अपघात नेमका कसा घडला? हे स्पष्टपणे दिसून येत आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Last Updated: December 13, 2025, 16:37 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
Idli Vada Pav Recipe:वडापाव भारीच...पण 'इडली वडापाव' खाऊन बघितलाय कधी? झटपट रेसिपी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल