Hanuman Janmotsav 2025: शनिवारी हनुमान जयंती येण्याचा दुर्मीळ योगायोग; मागं लागलेल्या साडेसातीतून सुटका
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Hanuman Janmotsav 2025: १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल आणि हा दिवस शनिवार आहे. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. हनुमानाला शंकराचा ११ वा रुद्र अवतार मानले जाते. हनुमानाची पूजा केल्याने सर्व रोग आणि दुःख दूर होतात. कुंडलीत शनीची साडेसाती, शनिदोष असल्यास ज्योतिषी हनुमानाचे ध्यान आणि पूजा करण्याचा सल्ला देतात. पौराणिक मान्यतेनुसार, हनुमानाची पूजा करणाऱ्यांवर शनिदेव वक्रदृष्टी टाकत नाहीत. जाणून घेऊया हनुमान जन्मोत्सवात शनिदेवाच्या साडेसातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत.
advertisement
1/5

शनीच्या महादशेपासून सुटका मिळविण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास करावा, लाल रंगाचे कपडे घाला आणि हनुमान मंदिरात जाऊन लाल कापड अर्पण करा. मारुती समोर बसून मंदिरात ११ वेळा हनुमान चालीसा पठण करा.
advertisement
2/5
हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास करावा, हनुमानाच्या मंदिरात जाऊन बुंदी आणि हरभरा अर्पण करा. यानंतर, चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि सुंदरकांड पठण करा.
advertisement
3/5
हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास करा आणि हनुमानजींना सिंदूर, तोळा आणि चमेलीचे तेल अर्पण करा. तसेच वडाच्या झाडाची ८ पाने घ्या आणि त्यावर सिंदूर लावून राम राम हे नाव लिहा आणि नंतर ती पाने काळ्या धाग्यावर बांधा आणि हनुमानाला अर्पण करा. असे केल्याने शनि महादशाचे अशुभ परिणाम कमी होतील.
advertisement
4/5
हनुमान जयंतीच्या दिवशी नारळ घेऊन हनुमान मंदिरात वाढवावा. यानंतर, तुपाचा दिवा लावा आणि ओम ह्रं हनुमते नम: या मंत्राचा १०८ वेळा जप करा. असे केल्याने हनुमानाचा आशीर्वाद मिळतो.
advertisement
5/5
हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला लवंगासह सुपारी अर्पण करा आणि त्यासोबत बदाम देखील अर्पण करा. यानंतर, काळे कापड घ्या आणि त्यात अर्धे बदाम टाकून बांधा. घराच्या दक्षिणेकडील बाजूला तो लपवून बांधा. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी शनिदेवाचे दर्शन घेतल्यानंतर शनि मंदिरात ते ठेवू शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Hanuman Janmotsav 2025: शनिवारी हनुमान जयंती येण्याचा दुर्मीळ योगायोग; मागं लागलेल्या साडेसातीतून सुटका