TRENDING:

Vastu Tips: संकटांचे मूळ कारण! किचनमधील या 4 गोष्टी पूर्णपणे संपणे अशुभ, असा वाढतो त्रास

Last Updated:
Kitchen Vastu Tips: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी चढ-उतार येत असतात. काहींना कमी तर काहींना जास्त त्रास सहन करावा लागतो. कधी कधी परिस्थिती इतकी बिकट होते की लोक एका-एका पैशासाठी हतबल होतात. अशा स्थितीत सुखी घरावर दुःखाचे सावट गडद होत जाते. कष्ट करूनही परिस्थती बदलण्याचं नाव घेत नाही. त्यामागे काही दोष असू शकतात हे अनेकांना माहीत नाही. हा दोष तुमच्या स्वयंपाकघरातील असू शकतो.
advertisement
1/5
संकटांचे मूळ कारण! किचनमधील या 4 गोष्टी पूर्णपणे संपणे अशुभ, असा वाढतो त्रास
ज्योतिषांच्या मते, घरात आनंदी वातावरण कायम हवे असेल तर स्वयंपाकघरातील काही गोष्टी संपू देऊ नये. या गोष्टींचा जीवनाशी काय संबंध? ज्योतिषी ऋषिकांत मिश्रा शास्त्री यांनी याविषयी न्यूज 18 मराठीला माहिती दिली आहे.
advertisement
2/5
किचनमधील या गोष्टी पूर्ण संपू देऊ नयेत -मीठ : ऋषिकांत मिश्रा सांगतात की, ज्योतिषशास्त्रात मीठ हा राहूचा पदार्थ मानला जातो. त्यामुळे स्वयंपाकघरात मिठाचा अभाव असल्यानं राहुची दृष्टी तुमच्या आयुष्यात येते. मीठ पूर्ण संपण्यापूर्वी आणावे. यामुळे तुमचे जीवन अडचणींनी सदा भरलेले राहु शकते.
advertisement
3/5
मोहरीचे तेल : स्वयंपाकघरातील मोहरीचे तेल कधीही पूर्ण संपू देऊ नये. यामुळे शनीची वक्रदृष्टी त्रास देऊ शकते. याने आपल्या व्यवसायात नुकसान होऊ शकते आणि शनिदोषही होऊ शकतो.
advertisement
4/5
हळद: ज्योतिषांच्या मते, स्वयंपाकघरातील हळद पूर्ण संपू देऊ नये. हळदीचा संबंध गुरु दोषाशी जोडला जातो. घरामध्ये गुरु दोष असला की आर्थिक संकट येते असे मानले जाते. नोकरीत नुकसान होऊ शकते.
advertisement
5/5
तांदूळ : घरातील तांदूळ पूर्ण संपणे चांगले मानले जात नाही. ज्योतिषशास्त्रात तांदूळ शुक्र दोष दर्शवतो. घरामध्ये शुक्र दोषामुळे पती-पत्नीमध्ये भांडणे सुरू होतात. इतकंच नाही तर आजूबाजूच्या लोकांशीही जमत नाही.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Vastu Tips: संकटांचे मूळ कारण! किचनमधील या 4 गोष्टी पूर्णपणे संपणे अशुभ, असा वाढतो त्रास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल