TRENDING:

यंदाची जन्माष्टमी 3 राशींची! साक्षात श्रीकृष्ण पाठीशी, मग चिंता कसली...

Last Updated:
Janmashtami 2024 Horoscope: श्रीकृष्ण जन्माष्टमी हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. जगाला प्रेमाचा संदेश देणाऱ्या भगवान कृष्णाचा या दिवशी जन्म झाला होता, अशी मान्यता आहे. यंदाची जन्माष्टमी 3 राशींसाठी अत्यंत सुखद ठरणार आहे. कारण या दिवशी जुळून आलेल्या योगांमुळे 3 राशींच्या व्यक्तींना मनासारखे दिवस पाहायला मिळतील, असं ज्योतिषांनी सांगितलं. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/5
यंदाची जन्माष्टमी 3 राशींची! साक्षात श्रीकृष्ण पाठीशी, मग चिंता कसली...
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्ण जन्माष्टमीला सर्वार्थ सिद्धी, गज केसरी आणि शश राजयोग जुळून येईल. शिवाय बुध ग्रहाचा कर्क राशीत उदय होतोय. त्यामुळे हा दिवस ग्रह, ताऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. यानिमित्त 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब पार उजळून निघेल, त्यांना साक्षात भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळेल.
advertisement
2/5
वृषभ : जन्माष्टमीला जुळून आलेले दुर्मीळ योग आपल्यासाठी <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/special-naivedya-for-krishna-on-janmashtami-for-happy-life-l18w-mhij-local18-1236210.html">अत्यंत लाभदायी</a> ठरतील. आपल्याला नोकरी, व्यवसायात यश मिळेल, <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/for-prosperity-bring-these-things-home-this-janmashtami-l18w-mhij-local18-1235151.html">धनसंपत्तीत वाढ होईल</a>, प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल.
advertisement
3/5
कुंभ : आपल्यासाठी हा काळ अत्यंत शुभ असेल. साक्षात कृष्णाच्या आशीर्वादानं आपल्या अडचणी दूर होतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. उत्तम संधीदेखील मिळतील.
advertisement
4/5
सिंह : आपल्यासाठी या जन्माष्टमीला धनयोग जुळून येतोय. व्यापार विस्तारेल, आरोग्यासंबंधित अडचणी दूर होतील. बऱ्याच काळापासून सुरू असलेले वाद आता मिटतील.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
यंदाची जन्माष्टमी 3 राशींची! साक्षात श्रीकृष्ण पाठीशी, मग चिंता कसली...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल