TRENDING:

PHOTOS : बागेश्वर बाबा, सचिन तेंडूलकर ते अजय देवगणपर्यंत, 2 वर्षांत 13 कोटी भाविकांनी घेतले याठिकाणी दर्शन

Last Updated:
Kashi Vishwanath Dham : काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. पण या दोन वर्षांत सुमारे 13 कोटी भाविकांनी बाबांच्या धामवर दर्शन घेतले. तसेच व्हीव्हीआयपीं सुद्धा येथे दर्शनासाठी आलेले पाहायला मिळाले. या कालावधीत क्रिकेटच्या दिग्गजांसह बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहऱ्यांनीही काशी विश्वनाथ धामला भेट दिली आहे. (अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी)
advertisement
1/5
बागेश्वर बाबा, सचिन तेंडूलकर ते अजय देवगणपर्यंत, 2 वर्षांत 13 कोटी भाविकांनी...
बागेश्वर सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली होती. काशी विश्वनाथ मंदिरात बागेश्वर बाबा पोहोचण्याची ही पहिलीच वेळ होती. अप्रतिम धामाचे सौंदर्य पाहून तेसुद्धा येथील चाहते झाला.
advertisement
2/5
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही पहिल्यांदा सप्टेंबर 2023 मध्ये, काशी विश्वनाथ धामला भेट देत बाबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत कपिल देव, सुनील गावस्कर आणि इतर अनेक लोक उपस्थित होते.
advertisement
3/5
बॉलीवूड स्टार सुनील शेट्टीही या वर्षी सप्टेंबर महिन्यात काशी विश्वनाथ बाबाच्या धामला पोहोचले होते. यासोबतच त्यांनी पुन्हा धामला भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
advertisement
4/5
चित्रपट अभिनेता अभिषेक बच्चन यांनीही गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये (2022) काशी विश्वनाथ धामला भेट दिली होती. यावेळी अभिषेक बच्चन कपाळावर चंदन आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण करताना दिसले.
advertisement
5/5
त्याचवेळी 'दृश्यम-2' चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणनेही बाबांच्या दरबारात नतमस्तक होत दर्शन घेतले. तेसुद्धा येथील सुंदरतेचे चाहते झाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
PHOTOS : बागेश्वर बाबा, सचिन तेंडूलकर ते अजय देवगणपर्यंत, 2 वर्षांत 13 कोटी भाविकांनी घेतले याठिकाणी दर्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल