TRENDING:

Lord Shiva : शिवलिंगाला त्रिपुंड लावताना तुम्ही ही चूक करत नाही ना? जाणून घ्या योग्य पद्धत

Last Updated:
हिंदू धर्मात प्रत्येक देवदेवतेच्या पूजा-विधीच्या काही विशिष्ट नियमांचं पालन केलं जातं. प्रत्येक देव-देवतेला गंध, टिळा लावण्याच्या पद्धतीदेखील वेगवेगळ्या आहेत. भगवान शंकराच्या पिंडीला तीन बोटांनी भस्म अर्थात त्रिपुंड लावलं जातं. शिवपिंडीला अशा पद्धतीनं त्रिपुंड लावण्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. या त्रिपुंडामध्ये अनेक देवदेवतांच्या शक्ती सामावलेल्या असतात, असं सांगितलं जातं. त्रिपुंड लावण्याची योग्य पद्धतं, त्याचे फायदे याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
advertisement
1/7
शिवलिंगाला त्रिपुंड लावताना तुम्ही ही चूक करत नाही ना? जाणून घ्या योग्य पद्धत
हिंदू धर्मात पूजा विधी करताना कपाळावर टिळा लावला जातो. देवदेवतांची पूजा केल्यावर विशिष्ट प्रकारचा टिळा लावला जातो. त्यामुळे त्यांचं रूप अधिकच सुंदर दिसतं. भगवान शंकराची पूजा करताना शिवपिंडीला तीन बोटांनी भस्म अर्थात त्रिपुंड लावलं जातं. यासाठी चंदनाचादेखील वापर होतो. या त्रिपुंडामध्ये अनेक देवी-देवतांच्या शक्ती सामावलेल्या असतात, असं मानलं जातं.
advertisement
2/7
धर्मशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीने त्याच्या कपाळावर त्रिपुंड लावलं तर त्याला 27 देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार, अशा व्यक्तीच्या मनात वाईट विचार निर्माण होत नाहीत. मानसिक शांती लाभते. तसंच त्याचं वर्तन सौम्य राहतं. रोज त्रिपुंड लावल्यास संबंधित व्यक्ती पापमुक्त होते.
advertisement
3/7
शिव पुराणानुसार, जो शिवभक्त भगवान शंकराचा प्रसाद समजून त्रिपुंड लावतो, त्याच्यावर वाईट शक्तींचा परिणाम होत नाही. शरीरासह जीवनात सकारात्मक ऊर्जा संचारते. अशा व्यक्तींचा धार्मिक गोष्टींकडे कल वाढतो.
advertisement
4/7
कपाळावर तीन रेषांच्या स्वरूपात लावलेल्या टिळ्याला त्रिपुंड म्हणतात. यामुळे भगवान शंकराची कृपादृष्टी लाभते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, त्रिपुंडामध्ये 27 देवदेवतांचा वास असतो.
advertisement
5/7
त्रिपुंडातल्या प्रत्येक रेषेत 9 देवतांचा वास असतो. त्रिपुंडाच्या पहिल्या रेषेत महादेव, पृथ्वी, ऋवेद, धर्म, गार्हपत्य, रजोगुण, आकार, प्रातःकालीन हवन आणि क्रियाशक्ती देवता असतात.
advertisement
6/7
दुसऱ्या रेषेत इच्छाशक्ती, अंतरात्मा, दक्षिणाग्नी, सत्त्वगुण, महेश्वर, ऊंकार, आकाश आणि माध्यन्य हवन देवता विराजमान असतात. तिसऱ्या रेषेत शिव, आहवनीय अग्नी, सामवेद, ज्ञानशक्ती, तृतीय हवन स्वर्ग लोक, तमोगुण आणि परत्माम्याचा वास असतो.
advertisement
7/7
शिवपुराणानुसार, शिवलिंग म्हणजेच भगवान शंकराला त्रिपुंड हे चंदन, रक्तचंदन किंवा अष्टगंधाचा वापर करून लावतात. त्रिपुंड लावताना सर्वप्रथम उजव्या हाताच्या मधल्या बोटाने दोन रेषा काढाव्यात. त्यानंतर तर्जनीने एक रेषा काढावी. त्रिपुंड लावताना डाव्या डोळ्यापासून उजव्या डोळ्याच्या दिशेने लावावं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Lord Shiva : शिवलिंगाला त्रिपुंड लावताना तुम्ही ही चूक करत नाही ना? जाणून घ्या योग्य पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल