janmashtami 2024: जन्माष्टमीला रात्री 'हे' उपाय केल्यास घरात नांदेल सुख-समृद्धी; आर्थिक समस्या होतील दूर
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
janmashtami 2024: हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्ण जयंती अर्थात जन्माष्टमी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून बाळकृष्णाची पूजा केली जाते. यंदा 26 ऑगस्टला (सोमवारी) जन्माष्टमी आहे. या दिवशी काही खास उपाय केले, तर तुमची मनोकामना पूर्ण होऊ शकते. या उपायांची माहिती सविस्तर जाणून घेऊ या.
advertisement
1/6

पंचांगानुसार श्रावण कृष्ण अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. या वर्षी 26 ऑगस्टला जन्माष्टमीचा उपवास असेल. तसंच या दिवशी बाळकृष्णाची विधिवत पूजा केली जाईल. या दिवशी उपवास आणि विधिवत पूजा केल्यास श्रीकृष्ण तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, असं मानलं जातं.
advertisement
2/6
जी व्यक्ती अपत्यप्राप्तीसाठी या दिवशी विधिवत पूजा करून व्रत करते, त्या व्यक्तीची इच्छा लवकर पूर्ण होते, असं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पूजाविधीसह काही उपाय केले तर फलदायी ठरतात. यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
advertisement
3/6
आपल्याकडे भरपूर पैसा असावा, आपली प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं. जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तर त्यासाठी एक उपाय करू शकता. जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर राधा-कृष्णाच्या मंदिरात जावं आणि भगवान श्रीकृष्णाला पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा. यामुळे धनलाभाचे योग तयार होतात आणि आर्थिक समस्या दूर होऊ लागते. तसंच या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे, फळं, धान्य आदी दान करणं शुभ मानलं जातं.
advertisement
4/6
घरात सातत्याने कलह होत असेल तर तुम्ही जन्माष्टमीला एक उपाय करू शकता. जन्माष्टमीच्या दिवशी सायंकाळी घरातल्या तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करून तुळशीला 21 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे घरात सुख-शांती नांदते. घरातले क्लेश नष्ट होतात आणि प्रगती होते.
advertisement
5/6
घरात आर्थिक समस्या असतील, कठोर परिश्रम करूनही पैशांची टंचाई जाणवत असेल तर जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी तुम्ही खास उपाय करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्णाला केसरयु्क्त दुधाचा अभिषेक करावा. यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि धन-धान्याची कमतरता भासत नाही, असं सांगितलं जातं.
advertisement
6/6
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
janmashtami 2024: जन्माष्टमीला रात्री 'हे' उपाय केल्यास घरात नांदेल सुख-समृद्धी; आर्थिक समस्या होतील दूर