TRENDING:

200 वर्षांनी आलाय अनोखा योग; रक्षाबंधनाला उजळणार 'या' 3 राशींच्या लोकांचं नशीब

Last Updated:
या अद्भुत योगाचा विविध राशींवर परिणाम दिसून येईल. काही राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अतिशय चांगले बदल घडणार आहेत. त्यांच्या आयुष्यातलं दारिद्र्य पूर्णतः संपेल.
advertisement
1/5
200 वर्षांनी आलाय योग; रक्षाबंधनाला उजळणार 3 राशींच्या लोकांचं नशीब
हिंदू धर्मात दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमा तिथीला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. यंदा हा सण 30 आणि 31 ऑगस्टला साजरा होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या सणानिमित्त यंदा 200 वर्षांनी एक अनोखा योग आला आहे. या काळात शनी आणि गुरु ग्रह वक्र स्थितीत आपल्या स्वराशीत विराजमान होणार आहेत. तर दुसरीकडे जवळपास 24 वर्षांनंतर रक्षाबंधनाच्या दिवशी रवी योग, बुधादित्य योग आणि शतभिषा नक्षत्राचा संयोग होणार आहे.
advertisement
2/5
या अद्भुत योगाचा विविध राशींवर परिणाम दिसून येईल. काही राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अतिशय चांगले बदल घडणार आहेत. त्यांच्या आयुष्यातलं दारिद्र्य पूर्णतः संपेल, असं अयोध्येचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलं आहे. त्यानुसार, सिंह, मिथुन आणि धनू राशीच्या व्यक्तींसाठी हा योग फलदायी ठरेल.
advertisement
3/5
सिंह : रक्षाबंधनाच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींचं नशीब अक्षरश: चमकणार आहे. लक्ष्मी देवी आणि शनी देवाच्या कृपेने आपला व्यवसाय, व्यापार वृद्धिंगत होईल. गुंतवणुकीसाठी हा दिवस शुभ ठरेल. शिवाय आपल्या वैवाहिक जीवनातही सुख येईल.
advertisement
4/5
धनू : आपल्यासाठी यंदाची रक्षाबंधन म्हणजे सुवर्णकाळ ठरणार आहे. या दिवशी आपलं दीर्घकाळापासून रखडलेलं एखादं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबातील वातावरणही छान प्रसन्न राहील. आपलं उत्पन्न वाढेल, शिवाय समाजात मानसन्मानदेखील मिळेल. तसंच कार्यक्षेत्र विस्तारेल.
advertisement
5/5
मिथुन : या राशीच्या व्यक्तींसाठी यंदाची रक्षाबंधन अतिशय खास ठरणार आहे. आपल्या आर्थिक अडचणी एका क्षणात संपतील. ग्रहदोषामुळे विवाह जुळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
200 वर्षांनी आलाय अनोखा योग; रक्षाबंधनाला उजळणार 'या' 3 राशींच्या लोकांचं नशीब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल