TRENDING:

‘इथं’ आहे 300 वर्षांपूर्वीचे झुरळे गोपीनाथ मंदिर, झुरळांच्या रूपाने गोपिका वास्तव्यास असल्याची सांगितली जाते आख्यायिका

Last Updated:
जमिनीपासून दहा फूट खोल असलेल्या या मंदिराच्या गाभाऱ्यात झुरळाच्या रूपाने गोपिका कायम वास्तव्यास असल्याचे या मंदिराची आख्यायिका सांगितली जाते.
advertisement
1/7
‘इथं’ आहे 300 वर्षांपूर्वीचे झुरळे गोपीनाथ मंदिर, अशी सांगितली जाते आख्यायिका
अनेक गाव शहरांमध्ये धार्मिक महत्त्व प्राप्त झालेली मंदिरे आपल्याला पाहिला मिळतात. बीड जिल्ह्यात देखील अनेक वास्तू शिल्पकला आणि मंदिरे आजही आपल्याला इतिहासाची साक्ष देतात. <a href="https://news18marathi.com/maharashtra/beed/">बीड</a> जिल्ह्यातील परळीमध्ये झुरळे गोपीनाथ मंदिर हे 300 वर्षांपूर्वीचे आहे.
advertisement
2/7
परळी शहरातील जुन्या गावभागात 300 वर्षांपूर्वीची झुरळे गोपीनाथाची विष्णू रूपातील मूर्ती आहे. जमिनीपासून दहा फूट खोल असलेल्या या मंदिराच्या गाभाऱ्यात झुरळाच्या रूपाने गोपिका कायम वास्तव्यास असल्याचे या मंदिराची आख्यायिका सांगितली जाते.
advertisement
3/7
भगवान विष्णूस झुरळे गोपीनाथ म्हणून ओळखले जाते. आज गोकुळाष्टमीनिमित्त या मंदिरात दिवसभर दर्शन आणि रात्री दहा ते बारा या वेळेत झुरळे गोपीनाथाच्या मूर्ती अभिषेक केला जाणार असून रात्री बारा वाजता गुलाल उधळून कृष्ण जन्मोत्सव सोहळा होणार आहे.
advertisement
4/7
काय आहे मंदिराचा इतिहास : परळी शहरातील गणेश पार भागातील मोरेश्वर गणपतराव बडवे यांना घराशेजारी पिंपळाच्या झाडाखाली विष्णूची मूर्ती असल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी खोदकाम केल्यानंतर शालीग्रामाची चार फूट उंचीची भगवान विष्णूची मूर्ती सापडली होती. या मंदिराचा जमिनीपासून दहा फूट खोल गाभारा तयार करून बडवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला या मंदिराची व्यवस्था बडवे घराण्याकडे आहे.
advertisement
5/7
भगवान विष्णू देवाचे इथे प्रभुवैद्यनाथामुळे वास्तव्य असून हरी म्हणजे विष्णू आणि हार म्हणजे महादेव म्हणून परळी शहरात हरिहर तीर्थ दिसून येते. प्रभुवैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर शहरातील झुरळे गोपीनाथाचे दर्शन घेण्याची इथे प्रथा आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात वर्षभर झुरळांचा वावर असतो ही झुरळे म्हणजे कृष्णाच्या गोपिका असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
advertisement
6/7
परळी शहरातील झुरळे गोपीनाथ मंदिरात भाविकांची विशेषता श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी मोठी गर्दी असते. झुरळांचा या मंदिरात वर्षभर वावर असतो आणि झुरळ म्हणजे कृष्णाच्या गोपिका असल्याची आख्यायिका सांगितली जाते, असं पुजारी अनिल बडवे यांनी सांगितले.
advertisement
7/7
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
‘इथं’ आहे 300 वर्षांपूर्वीचे झुरळे गोपीनाथ मंदिर, झुरळांच्या रूपाने गोपिका वास्तव्यास असल्याची सांगितली जाते आख्यायिका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल