TRENDING:

भारतातील अनोखं मंदिर, जिथं एकही मूर्ती नाही, पाहण्यासाठी परदेशातूनही येतात लोक

Last Updated:
Lotus Temple: भारतात अनेक प्रसिद्ध मंदिरे असून यातील विविध देवतांच्या मूर्तीही वैशिष्ट्यपूर्ण असतात. परंतु, दिल्लीत असं एक मंदिर आहे, जिथं कुणी पुजारी नाही आणि मूर्तीही नाही. याला लोटस टेंपल म्हणून ओळखळं जातं. लोटस टेंपल हे बहाई धर्माचे श्रद्धास्थान म्हणून ओळखलं जातं.
advertisement
1/5
भारतातील अनोखं मंदिर, जिथं एकही मूर्ती नाही, पाहण्यासाठी परदेशातूनही येतात लोक
दिल्लीतील लोटस टेंपल हे बहाई धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. भारतातील सर्वात अद्वितीय मंदिरांपैकी हे एक मानले जाते. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणतीही मूर्ती नाही आणि धार्मिक विधीही केले जात नाहीत. त्याऐवजी, विविध धर्मांशी संबंधित पवित्र ग्रंथ येथे वाचले जातात. विविध धर्म आणि संस्कृतींच्या संगमाचे ते प्रतीक बनतात.
advertisement
2/5
लोटस टेंपलची वास्तुकलाच मंदिराचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य आहे. ही इमारत 27 मुक्त-स्थायी संगमरवरी पाकळ्यांनी बनलेली असून ती कमळाच्या फुलासारखी दिसते. या पाकळ्या नऊ भागांमध्ये विभागलेल्या तीन गुच्छांमध्ये आहेत. मंदिराचा मुख्य दरवाजा 40 मीटरपेक्षा जास्त उंच असून इथं नऊ दरवाजे आहेत. मंदिरात एकावेळी 2,500 लोकांची क्षमता असलेलं प्रार्थनागृह आहे.
advertisement
3/5
लोटस टेंपल हे केवळ त्याच्या वास्तुकलेसाठीच नाही तर शांत आणि आध्यात्मिक वातावरणासाठीही प्रसिद्ध आहे. येथे येणारे लोक शांतता आणि एकाग्रतेचा अनुभव घेतात. विविध धर्मांच्या पवित्र ग्रंथांचे पठण आणि भक्तीची भावना इथं येणाऱ्यांना एक नवी ऊर्जा देते.
advertisement
4/5
दिल्लीतील नेहरू प्लेस परिसरात असलेलं लोटस टेंपल 1986 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं. प्रसिद्ध इराणी वास्तुविशारद फरीबर्ज साहबा यांनी हे बांधलं होतं. मंदिर संगमरवरी बनलेले असून त्याची रचना कमळाच्या फुलाच्या पाकळ्यांच्या रूपात करण्यात आली आहे.
advertisement
5/5
लोटस टेंपलला अद्वितीय वास्तुकला आणि डिझाइनसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. लोटस टेंपल हे केवळ धार्मिक स्थळच नाही, तर ते एक असं ठिकाण आहे जिथं लोक शांतता, प्रेम आणि एकता अनुभवायला येतात. त्यामुळे अशा ठिकाणी एकदातरी भेट देण्याची अनेकांची इच्छा असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
भारतातील अनोखं मंदिर, जिथं एकही मूर्ती नाही, पाहण्यासाठी परदेशातूनही येतात लोक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल