TRENDING:

Suryanarayana Swamy Mandir: 16 एकरात सूर्यदेवाचं अनोखं मंदिर! इथं दोन्ही पत्नींसह दर्शन देतात भास्कर

Last Updated:
Suryanarayana Swamy Mandir: भारतात सूर्य नारायणाची अनेक मंदिरं आहेत, पण आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या पेद्दापुडी मंडलजवळ असलेलं भगवान सूर्याचं सूर्यनारायण स्वामी मंदिर खूप खास मानलं जातं. इथे भगवान सूर्य आपल्या दोन्ही पत्नींसोबत दर्शन देतात, भक्तांचे सर्व कष्ट दूर करतात. या सूर्यनारायण स्वामी मंदिराविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
1/5
16 एकरात सूर्यदेवाचं अनोखं मंदिर! इथं दोन्ही पत्नींसह दर्शन देतात भास्कर
देशभरात भगवान सूर्याची अनेक मंदिरं आहेत, येथे भाविक-भक्त आपापल्या इच्छा घेऊन जातात. सूर्य देवाची पूजा केल्यानं आयुष्यात प्रगती होते, शत्रूंचा नाश होतो आणि कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते. असं म्हणतात की भगवान शंकरासोबतच्या युद्धात भगवान सूर्याचे १२ तुकडे झाले होते आणि त्यांचे तुकडे जिथे जिथे पडले, तिथे सूर्य मंदिरांची निर्मिती करण्यात आली. आंध्र प्रदेशातही असंच एक मंदिर आहे, तिथे भगवान सूर्य आपल्या दोन्ही पत्नींसोबत विराजमान आहेत. आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या पेद्दापुडी मंडलजवळ असलेल्या गोलाला ममीदादा गावात भगवान सूर्याचं सूर्यनारायण स्वामी मंदिर आहे. या मंदिराविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया:  
advertisement
2/5
सूर्यनारायण स्वामी मंदिराविषयी खास गोष्टी -सूर्यनारायण स्वामी मंदिर थुल्या भागा (तुंगभद्रा) नदीच्या किनारी बनवलेलं आहे. हे मंदिर 16 एकर जागेवर पसरलेलं आहे आणि याचं गोपुरम् (प्रवेशद्वाराचा आकार) 170 फूट उंच आहे, जे वेगवेगळ्या नक्षीकामांनी सजवलेलं आहे. गोपुरमावर वेगवेगळ्या देवी-देवतांच्या मूर्ती बारकाईने कोरल्या गेल्या आहेत, ज्यात हिंदू धर्मातल्या महाकाव्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या कलेला चिन्ना भद्राचलम या नावाने ओळखलं जातं. गोपुरमाला सजवण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर केला गेला आहे.
advertisement
3/5
मंदिराचं बांधकाम कोणी केलं?मंदिराची स्थापना १९२० साली श्री कोव्वुरी बसिवि रेड्डी गारू नावाच्या समाजसेवकाने केली होती. गारू यांच्याबद्दल असं म्हणतात की, गावात त्यांच्यासारखा धार्मिक आणि दानशूर व्यक्ती कोणी नव्हता. त्यांनी फक्त मंदिरासाठीच नाही, तर आपलं संपूर्ण आयुष्य मोठ्या प्रमाणात जनतेच्या कल्याणासाठी आणि फायद्यासाठी समर्पित केलं. त्यांनीच हे मंदिर बांधून घेतलं आहे आणि आजही हिंदू शास्त्रांनुसार भगवान सूर्याची पूजा केली जाते.
advertisement
4/5
दोन्ही पत्नींसोबत आहेत विराजमान -मंदिराचं प्रवेशद्वार ते गर्भगृह दोन्ही पाहण्यासारखं आहे. प्रवेशद्वारावर सूर्य देव सात घोड्यांसोबत रथ चालवत आहेत, तर मंदिराच्या गर्भगृहात भगवान सूर्य आपल्या दोन्ही पत्नी उषा आणि छाया यांच्यासोबत विराजमान आहेत. अशी मान्यता आहे की, या मंदिरात येऊन भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुन्हा मंदिरात येण्याचा संकल्प करतात. तिथे भक्तांमध्ये देवाच्या नावावर शपथ घेण्याची प्रथा आहे आणि मनोकामना पूर्ण झाल्यावर ते ती शपथ किंवा संकल्प पूर्ण करतात.
advertisement
5/5
दर्शनाने सर्व दुःखं होतात दूरगर्भगृहात विराजमान असलेले भगवान सूर्य आणि त्यांच्या दोन्ही पत्नींच्या दर्शनाने सुख-संपत्ती आणि वैवाहिक जीवनात आनंदाचा आशीर्वाद मिळतो. भक्त लांबून लांबून भगवान सूर्याचे आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिरात येतात. रविवारच्या दिवशी मंदिरात जास्त गर्दी असते, कारण रविवारी मंदिरात विशेष पूजा विधी केले जातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
Suryanarayana Swamy Mandir: 16 एकरात सूर्यदेवाचं अनोखं मंदिर! इथं दोन्ही पत्नींसह दर्शन देतात भास्कर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल