Pitru Paksha: पितृपक्षात अशी स्वप्नं दिसणं म्हणजे शुभ संकेत; मिळू शकते मोठी खुशखबर!
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Pitru Paksha 2023: हिंदू कॅलेंडरनुसार पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्येच्या दिवसापर्यंत असतो. पितृ पक्षादरम्यान, लोक पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विविध उपाय करतात. यावर्षी पितृपक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, पितृपक्षात पितर पृथ्वीवर येतात. ज्योतिष शास्त्रानुसार, पितृपक्षादरम्यान जर तुम्हाला स्वप्नात पूर्वज दिसत असतील तर ते तुमच्या भविष्यासाठी काही संकेत असू शकतात. जाणून घेऊया, पितृपक्षात पितरांचे स्वप्न पाहिल्यास कोणते संकेत मिळतात.
advertisement
1/4

स्वप्नात पितरांना पाहण्याचा अर्थ काय?पितृपक्षाच्या काळात स्वप्नात तुम्हाला पूर्वज तुमच्याकडे हात पुढे करताना दिसले तर हे खूप शुभ लक्षण असल्याचे समजावे. म्हणजे तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप खुश आहेत. असे मानले जाते की, यामुळे जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी आणि संकटे लवकरच संपणार आहेत.
advertisement
2/4

स्वप्नात पूर्वज शांत दिसणं -स्वप्नात आपले पूर्वज शांत दिसत असतील तर याचा अर्थ त्यांना तुमच्या कुटुंबात आणि वैवाहिक जीवनात सुख-शांती हवी आहे. अशा स्थितीत पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात त्यांची धार्मिक पूजा, श्राद्ध, तर्पण, पिंडदान इत्यादी गोष्टी कराव्यात.
advertisement
3/4
असं स्वप्न म्हणजे 'गुडन्यूज' -पितृपक्षामध्ये पूर्वज तुम्हाला मिठाई खाऊ घालताना स्वप्नात दिसले तर हे स्वप्न अतिशय शुभ मानले जाते. याचा अर्थ असा आहे की तुमचे पूर्वज तुमच्यावर आनंदी आहेत आणि तुम्हाला लवकरच काही नवीन आनंदाची बातमी मिळणार आहे.
advertisement
4/4
केस विंचरताना दिसणे -पितृ पक्षादरम्यान पूर्वज स्वप्नात केस विंचरताना दिसले तर समजून घ्या की, तुमच्यावर येणार्या सर्व अडचणी आणि संकटांपासून तुमचे रक्षण होऊ शकते. पितृपक्षात असे स्वप्न पाहणे खूप शुभ मानले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Pitru Paksha: पितृपक्षात अशी स्वप्नं दिसणं म्हणजे शुभ संकेत; मिळू शकते मोठी खुशखबर!