Vastu Tips: धनहानीचं संकट ओढावतं! घरातील या गोष्टींना कधीही पायांनी स्पर्श करू नये
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi : सनातन हिंदू धर्मात पाप आणि पुण्य याबद्दल सविस्तर वर्णन करण्यात आलं आहे. अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांना पायांनी स्पर्श करू नये. तसं करणं हे पाप आहे, असं मानलं जातं. पद्मपुराणात या गोष्टींचा उल्लेख आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यांना शास्त्रात पायांनी स्पर्श करणं चुकीचं मानलं आहे. जाणून घेऊया ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून. एखाद्या व्यक्तीनं या गोष्टींना पायांनी स्पर्श केला तर तो पापाचा भागिदार होतो, असे मानले जाते.
advertisement
1/6

1. शंख - पंडितजींच्या मते प्रत्येक कणात देवाचा वास आहे. आपण पृथ्वीवर चालतो, पण तिला मातेचा दर्जा दिला आहे. शंखाला कधीही पायानं स्पर्श करू नये. त्यात लक्ष्मीचा वास असतो. असे केल्यास धनहानी होऊ शकते.
advertisement
2/6
2. गाय - सनातन हिंदू धर्मात गाईची माता म्हणून पूजा केली जाते. गायीला कधी पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी. गायीच्या पाय लावल्यानं बुद्धीचा नाश होतो, असे मानले जाते.
advertisement
3/6
3. झाडू - घरातील झाडूला कधीही पायांनी स्पर्श करू नये. झाडू दारिद्र्य दूर करतो, त्यात देवी लक्ष्मी वास करते, अशी श्रद्धा आहे.
advertisement
4/6
4. पितळी भांडी - पितळेची भांडी सूर्याचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे या भांड्यांना कधीही पाय लावू नये. तसं केल्यानं कुंडलीत सूर्य-चंद्र कमजोर होऊ शकतो.
advertisement
5/6
5. तुळशीची पाने - सनातन धर्मात तुळशीच्या पानांचे विशेष महत्त्व असून त्यांना पूजनीय मानले जाते. तुळशीच्या पानांना कधीही पायानं स्पर्श करू नये.
advertisement
6/6
6. अन्न आणि पेये - अन्नपदार्थांना पायानं स्पर्श करू नये. याशिवाय पूजा किंवा हवनाच्या साहित्याला कधीही पायाने स्पर्श करू नये. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Vastu Tips: धनहानीचं संकट ओढावतं! घरातील या गोष्टींना कधीही पायांनी स्पर्श करू नये