TRENDING:

Amavasya: अतृप्त आत्मे मानवी शरीरात प्रवेश करतात? भूतडी अमावस्येला म्हणून करतात या गोष्टी

Last Updated:
Bhutadi amavasya: काही पौर्णिमा आणि अमावास्या विशेष असतात. राखी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा आदी तिथी शुभ आणि खास मानल्या जातात. तसंच सोमवती अमावास्या, शनी अमावास्या, सर्वपित्री अमावास्या याही विशेष मानल्या जातात. हिंदू धर्मात या दोन्ही तिथींचं वेगवेगळं महत्त्व आहे.
advertisement
1/6
अतृप्त आत्मे मानवी शरीरात प्रवेश करतात? भूतडी अमावस्येला म्हणून करतात या गोष्टी
हिंदू कालगणनेनुसार सध्या सुरू असलेल्या वर्षातली शेवटची अमावास्या 8 एप्रिल 2024 रोजी आहे. ही अमावास्या सोमवारी असल्याने ती सोमवती अमावास्या असेल. या दिवशी सूर्यग्रहण असल्याने तिचं महत्त्व अधिक आहे. खरं तर, सोमवती अमावास्येला भूतडी अमावास्या असं म्हणतात.
advertisement
2/6
यामागे काही खास कारण आहे. त्यात यंदा या दिवशी सूर्यग्रहणाचा अशुभ योग आहे. भूतडी अमावास्या म्हणजे काय, सूर्यग्रहण असल्याने या दिवशी काय काळजी घ्यावी ते सविस्तर जाणून घेऊ या. 
advertisement
3/6
फाल्गुन महिन्यातली अमावास्या सोमवारी आहे. त्यामुळे ती सोमवती अमावास्या असेल. ही अमावास्या भूतडी अमावस्या म्हणून ओळखली जाते. यंदा या दिवशी सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे ग्रहण सोमवारी रात्री नऊ वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल आणि दोन वाजून 22 मिनिटांनी ग्रहण सुटेल. भूतडी अमावास्येला सूर्यग्रहण असणं समस्या वाढवणारं मानलं जातं.
advertisement
4/6
ज्योतिषशास्त्रात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. या दिवशी पितरांना खूश ठेवण्यासाठी दानधर्म आणि पुण्यकर्म करावं. या दिवशी गंगा किंवा एखाद्या पवित्र नदीत स्नान करावं. पितरांच्या नावानं गरजूंना कपडे किंवा आवश्यक वस्तू दान कराव्यात. या दिवशी तुम्ही पितरांच्या आवडती मिठाईदेखील दान करू शकता.
advertisement
5/6
ज्योतिषशास्त्रानुसार, भूत याचा अर्थ मागच्या काळात होऊन गेलेली गोष्ट होय. एखादी अशी व्यक्ती जिचा मृत्यू झालेला असून ती भूतकाळात गेलेली आहे, तसंच अतृप्त, अनोळखी आत्मे किंवा कुटुंबातल्या ज्यांचा अकाली मृत्यू झाला आहे आणि त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, असे सदस्य किंवा नातेवाईकांचा आत्मा होय. असे आत्मे भूतडी अमावास्येला आपल्या कुटुंबातले सदस्य किंवा अनोळखी व्यक्तींच्या शरीरात प्रवेश करून आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, असं म्हटलं जातं. हे आत्मे नेहमीच असं करू शकत नाहीत; पण या दिवशी त्यांना विशेष बळ प्राप्त होतं आणि ते कमजोर व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात.
advertisement
6/6
त्यामुळे आपल्या नाराज पितरांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी ही तिथी योग्य मानली जाते. त्यांच्या इच्छांकडे दुर्लक्ष केलं तर ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे या दिवशी पितरांचं स्मरण आणि दानधर्म करावा.(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Amavasya: अतृप्त आत्मे मानवी शरीरात प्रवेश करतात? भूतडी अमावस्येला म्हणून करतात या गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल