TRENDING:

Puja Coconut : पूजेचा नारळ खराब झाला तर काय होतं? हे कसले संकेत?

Last Updated:
हिंदू धर्मात पूजेत नारळाला खूप महत्त्व आहे. आपण पूजेत जो नारळ ठेवतो किंवा देवाला अर्पण करतो तो नंतर फोडून प्रसाद म्हणून वाटतो. पण जर हा नारळ खराब किंवा सुका निघाला तर अनेकांना ते अशुभ वाटतं. हे वाईट संकेत आहेत याची भीती वाटते. पण तसं नाही.
advertisement
1/7
Puja Coconut : पूजेचा नारळ खराब झाला तर काय होतं? हे कसले संकेत?
हिंदू धर्मात नारळाला खूप महत्त्व आहे. नारळ हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जाते. म्हणूनच पूजेत नारळ आवश्यक आहे. घर असो किंवा मंदिर, लोक प्रसादासोबत देवाला नारळ नक्कीच अर्पण करतात. पण काही वेळा हा पूजेचा नारळ खराब निघतो किंवा तो कोरडा असतो.
advertisement
2/7
देवाला अर्पण केलेला नारळ खराब आणि सुकलेला निघाला की लोकांना भीती वाटते. देव रागावला आहे, काहीतरी अशुभ घडलं आहे किंवा घडणार आहे, असं मानलं जातं. अशावेळी लोक घाबरतात.
advertisement
3/7
पण प्रत्यक्षात पूजा करताना अर्पण केलेला नारळ खराब निघाला किंवा सुकला असेल तो अशुभ नाही तर शुभ आहे. आता ते कसं पाहुयात.
advertisement
4/7
जर देवाला प्रसाद म्हणून अर्पण केलेला नारळ फोडताना तो चांगला असेल तर प्रसाद सर्वांना वाटून द्यावा. सर्वांना नारळ वाटणंदेखील शुभ मानलं जातं.
advertisement
5/7
पूजेचा नारळ खराब होणं हा देवाकडून मिळालेला चांगला संकेत आहे. नारळ फोडल्यावर सुका निघाला तर याचा अर्थ देवाने नैवेद्य स्वीकारला आहे. नारळ आतून खराब झाला असेल तर हे सूचित करतं की तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत.
advertisement
6/7
म्हणून जर पुढच्या वेळी तुम्ही नारळ फोडला तर आणि तो खराब निघाला तर घाबरून जाण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही. असा नारळ तुम्ही एका बाजूला ठेवू शकता. तो एखाद्या शुभ स्थानी ठेवा किंवा आगीतही समर्पित करू शकता.
advertisement
7/7
(सूचना : ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जी फक्त माहितीसाठी देण्यात आली आहे. तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Puja Coconut : पूजेचा नारळ खराब झाला तर काय होतं? हे कसले संकेत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल