उद्या मौनी अमावस्या! काळा आणि सफेद रंग घालण्यास बॅन, कोणता कलर ठरणार शुभं?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
18 जानेवारी 2026 रोजी माघ महिन्यातील अत्यंत पवित्र अशी 'मौनी अमावस्या' साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात या दिवसाला आध्यात्मिकदृष्ट्या सर्वोच्च स्थान दिले गेले आहे.
advertisement
1/6

18 जानेवारी 2026 रोजी माघ महिन्यातील अत्यंत पवित्र अशी 'मौनी अमावस्या' साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात या दिवसाला आध्यात्मिकदृष्ट्या सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्राचे अस्तित्व लोप पावलेले असते, ज्यामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिक असतो.
advertisement
2/6
अशा वेळी आपण परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगाचा आपल्या मानसिक आणि शारीरिक ऊर्जेवर मोठा परिणाम होतो. शास्त्रांनुसार, मौनी अमावस्येच्या दिवशी काळा आणि पांढरा रंग पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण यामागचे कारण आणि कोणते रंग तुमच्यासाठी शुभ ठरतील, हे जाणून घेणार आहोत.
advertisement
3/6
भगवा किंवा केशरी: भगवा रंग हा अग्नी आणि सूर्याचा प्रतीक आहे. हा रंग सकारात्मकता आणि ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. उद्या मौनी अमावस्येला भगवे कपडे घातल्याने मन प्रसन्न राहते आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते.
advertisement
4/6
पिवळा: पिवळा रंग हा गुरु ग्रहाचा आणि भगवान विष्णूंचा प्रिय रंग आहे. अमावस्येच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान केल्याने भाग्योदय होतो आणि बुद्धीमध्ये सात्त्विकता येते. विशेषतः स्नानानंतर पिवळे कपडे घालणे अत्यंत शुभ मानले जाते.
advertisement
5/6
लाल: लाल रंग हा शक्ती आणि मंगळ ग्रहाचा कारक आहे. हा रंग उत्साह वाढवतो. जर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडायचे असेल, तर लाल रंगाचा एखादा रुमाल किंवा कपडा सोबत ठेवल्याने आत्मविश्वासात वाढ होते.
advertisement
6/6
गुलाबी किंवा फिकट रंग: गर्द रंगांऐवजी फिकट गुलाबी किंवा सात्त्विक रंगांना पसंती द्या. यामुळे तुमची मानसिक शांती टिकून राहील आणि मौन व्रत पाळणे सोपे जाईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
उद्या मौनी अमावस्या! काळा आणि सफेद रंग घालण्यास बॅन, कोणता कलर ठरणार शुभं?