तुमच्या घरातील हा कोपरा जिथे असतो शनिचा प्रभाव, 4 चुका अजिबात करू नका, अन्यथा संकट येणारच
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Vastu Shashtra : वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशा, कोपरा आणि वस्तूंची मांडणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. घराचे वातावरण वास्तुनुसार असेल तर शांतता, आनंद, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य मिळते.
advertisement
1/6

जिथे स्वच्छता असते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो असं म्हंटलं जाते. परंतु घरात नकळत केलेल्या काही चुकांमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशा, कोपरा आणि वस्तूंची मांडणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. घराचे वातावरण वास्तुनुसार असेल तर शांतता, आनंद, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य मिळते. आज आपण त्या विशेष दिशेबद्दल जाणून घेऊया जिच्यावर शनिदेवांचा थेट प्रभाव असल्याचे मानले जाते.
advertisement
2/6
शनिदेवांचा प्रभाव कोणत्या दिशेवर असतो? - वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशा (दक्षिण-पश्चिम दिशा) ही शनिदेवांची प्रभावी दिशा मानली जाते. ही दिशा घरातील स्थैर्य, शक्ती, यश आणि आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक आहे. जर या कोपऱ्यात चुकीच्या वस्तू ठेवण्यात आल्या, तर नकारात्मक ऊर्जा वाढते आणि शनिदेवांचा अप्रसन्नता दर्शवणारे संकेत मिळू शकतात. याचा परिणाम घरातील शांततेवर, पैशाच्या स्थिरतेवर आणि निर्णयक्षमतेवरही होतो. म्हणूनच नैऋत्य दिशेची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
3/6
कचरा आणि तुटलेल्या वस्तू - नैऋत्य कोपऱ्यात कचरा, तुटलेली भांडी, मोडकी फर्निचर किंवा निरुपयोगी वस्तू ठेवू नयेत. अशा वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि शनिदेवांचा अशुभ प्रभाव असल्याचे मानले जाते.
advertisement
4/6
पाण्याशी संबंधित वस्तू - या दिशेत पाण्याचे तत्व ठेवणे अशुभ मानले जाते. पाण्याची टाकी, मत्स्यालय, टब किंवा इतर जल घटक ठेवले तर घरातील स्थैर्य कमी होते आणि जीवनात अस्थिरता वाढते.
advertisement
5/6
आरसा - या कोपऱ्यात आरसा ठेवणे बिल्कुल टाळावे. यामुळे घरातील सदस्यांमध्ये अनावश्यक वाद होतात आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते.
advertisement
6/6
निळा किंवा काळा - रंग नैऋत्य दिशेसाठी हे रंग अशुभ मानले जातात. या रंगांचा वापर जास्त प्रमाणात केल्यास शनिदेव नाराज होतात असे मानले जाते. याऐवजी हलके,मातीसारखे किंवा नैसर्गिक रंग वापरणे शुभ असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
तुमच्या घरातील हा कोपरा जिथे असतो शनिचा प्रभाव, 4 चुका अजिबात करू नका, अन्यथा संकट येणारच