TRENDING:

नशीब चमकणार! 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी 'मूंगा' ठरतो वरदान, सर्व इच्छा होतात पूर्ण

Last Updated:
रत्नशास्त्रानुसार रत्नांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. नऊ ग्रहांपैकी मंगळ ग्रहाचे प्रतिनिधीत्व करणारे रत्न म्हणजे 'मूंगा'. मंगळ हा ऊर्जा, धैर्य, शौर्य आणि जमिनीशी संबंधित कामांचा कारक मानला जातो.
advertisement
1/7
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी 'मूंगा' ठरतो वरदान, सर्व इच्छा होतात पूर्ण!
रत्नशास्त्रानुसार रत्नांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. नऊ ग्रहांपैकी मंगळ ग्रहाचे प्रतिनिधीत्व करणारे रत्न म्हणजे 'मूंगा'. मंगळ हा ऊर्जा, धैर्य, शौर्य आणि जमिनीशी संबंधित कामांचा कारक मानला जातो.
advertisement
2/7
ज्यांच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, त्यांना आयुष्यात मोठे यश मिळते. मात्र, मंगळ कमजोर असल्यास मूंगा धारण करण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी हे रत्न अत्यंत लकी मानले जाते.
advertisement
3/7
अंकशास्त्रानुसार, ज्यांचा मूलांक 9 आहे, त्यांच्यासाठी मूंगा हे सर्वात प्रभावशाली रत्न आहे. या तारखांना जन्मलेले लोक स्वभावाने साहसी असतात. मात्र, आयुष्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि रागावर नियंत्रण मिळवून ऊर्जा योग्य दिशेला वळवण्यासाठी त्यांना मूंगा घालण्याचा सल्ला दिला जातो. तसेच मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही हे रत्न अत्यंत शुभ असते.
advertisement
4/7
योग्य धातूची निवड: मूंगा नेहमी तांबे किंवा सोने या धातूंमध्ये बनवून घालणे सर्वात जास्त फलदायी मानले जाते. तांबे हा मंगळाचा धातू असल्याने तो रत्नाची शक्ती वाढवतो.
advertisement
5/7
शुभ दिवस आणि वेळ: मूंगा धारण करण्यासाठी मंगळवार हा सर्वोत्तम दिवस आहे. शक्य असल्यास मंगळवारी सूर्योदयानंतर सकाळी 6 ते 9 या वेळेत किंवा 'मंगळ होरा' पाहून हे रत्न धारण करावे. शुक्ल पक्षात हे रत्न घातल्यास अधिक चांगले फळ मिळते.
advertisement
6/7
योग्य बोट: मूंगा नेहमी उजव्या हाताच्या अनामिका म्हणजेच करंगळीच्या शेजारच्या बोटात धारण करावा. काही विशेष स्थितीत ज्योतिषी तर्जनीमध्ये घालण्याचा सल्लाही देतात.
advertisement
7/7
कोणासोबत घालू नये: मूंगा धारण केला असेल तर त्यासोबत विसरूनही हिरा, नीलम, पन्ना किंवा गोमेद ही रत्ने घालू नका. या ग्रहांची आपापसात शत्रूता असल्याने त्याचे भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
नशीब चमकणार! 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी 'मूंगा' ठरतो वरदान, सर्व इच्छा होतात पूर्ण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल