TRENDING:

IND vs NZ : गौतम गंभीरच्या लाडक्याला पहिल्याच T20 सामन्यात धक्का, सूर्याने Playing XI मधून केलं बाहेर!

Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात झाली आहे. नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकला आहे.
advertisement
1/7
गौतम गंभीरच्या लाडक्याला पहिल्याच सामन्यात धक्का, सूर्याने Playing XI मधून काढलं
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात झाली आहे. पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवला जात आहे.
advertisement
2/7
टी-20 वर्ल्ड कपच्या आधी दोन्ही टीमची ही शेवटची सीरिज आहे, त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड या सीरिजमध्ये तयारीची कोणतीही कसर सोडणार नाहीत. या टी-20 सीरिजनंतर 7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे.
advertisement
3/7
या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. याआधी न्यूझीलंडने भारताला वनडे सीरिजमध्ये 2-1 ने हरवलं आहे, त्यामुळे टी-20 सीरिजमध्ये त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही.
advertisement
4/7
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजआधी टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले. तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाल्यामुळे दोघंही टीमबाहेर झाले आहेत. या दोघांऐवजी श्रेयस अय्यर आणि रवी बिष्णोई यांची 15 सदस्यीय टीममध्ये निवड झाली आहे.
advertisement
5/7
श्रेयस अय्यर आणि रवी बिष्णोई यांना टीममध्ये जागा मिळाली असली, तरी त्यांना पहिल्या टी-20 सामन्यात बेंचवरच बसावं लागणार आहे. या सामन्यात टीम इंडियाने इशान किशनला संधी दिली आहे. इशान किशन या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करेल.
advertisement
6/7
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अक्षर पटेल, शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या हे दोन ऑलराऊंडर आहेत. तर फिनिशरची जबाबदारी रिंकू सिंगवर आहे. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह हे दोघं फास्ट बॉलर आणि वरुण चक्रवर्ती हा एकमेव स्पिनर आहे. हर्षित राणा, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर आणि रवी बिष्णोई यांना डच्चू देण्यात आला आहे.
advertisement
7/7
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : गौतम गंभीरच्या लाडक्याला पहिल्याच T20 सामन्यात धक्का, सूर्याने Playing XI मधून केलं बाहेर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल