TRENDING:

तुरीचे दर घसरले, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा

Last Updated:

21 जानेवारी बुधवार रोजी राज्यातील कृषी बाजारात आज प्रमुख शेतमालाच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. कपाशीच्या दरात किंचित वाढ नोंदवली गेली असली तरी कांद्याचे दर स्थिर राहिले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : 21 जानेवारी बुधवार रोजी राज्यातील कृषी बाजारात आज प्रमुख शेतमालाच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. कपाशीच्या दरात किंचित वाढ नोंदवली गेली असली तरी कांद्याचे दर स्थिर राहिले आहेत. मात्र, सोयाबीन आणि तूर या पिकांच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाहुयात, आज प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला.
advertisement

कपाशीच्या दरात किंचित वाढ

कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये कपाशीची एकूण 17 हजार 722 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये वर्धा मार्केटमध्ये 5 हजार 350 क्विंटल कपाशीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. वर्धा मार्केटमध्ये कपाशीला कमीत कमी 7 हजार 700 ते जास्तीत जास्त 8 हजार 240 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. तर यवतमाळ मार्केटमध्ये आलेल्या कपाशीला 8 हजार 320 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाला. मात्र, मंगळवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात किंचित वाढ झाल्याचे चित्र आहे.

advertisement

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा हवा बदल, गुरुवारी 'तो' परत येतोय, या जिल्ह्यांना अलर्ट

कांद्याचे दर स्थिर

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये कांद्याची एकूण 3 लाख 17 हजार 146 क्विंटल इतकी मोठी आवक झाली. यामध्ये नाशिक मार्केटमध्ये 1 लाख 37 हजार 004 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. नाशिक बाजारात कांद्याला कमीत कमी 533 ते जास्तीत जास्त 1 हजार 624 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच, अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या लाल कांद्याला 2 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे. मंगळवारी मिळालेले कांद्याचे सर्वाधिक दर आजही स्थिर आहे.

advertisement

सोयाबीनचेही दर पडलेत

राज्यात आज सोयाबीनची एकूण 36 हजार 098 क्विंटल इतकी आवक झाली. अकोला मार्केटमध्ये 6 हजार 349 क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. अकोला बाजारात सोयाबीनला कमीत कमी 4 हजार 750 ते जास्तीत जास्त 5 हजार 290 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. तसेच, जालना मार्केटमध्ये आलेल्या पिवळ्या सोयाबीनला 5 हजार 391 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाल्याचे चित्र आहे. मंगळवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

advertisement

तुरीचे दर घसरले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
माघी गणेश जयंतीला भाग्य उजळणार, 6 राशींवर बाप्पाची कृपा होणार!
सर्व पहा

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये तुरीची एकूण 32 हजार 345 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये जालना मार्केटमध्ये 9 हजार 131 क्विंटल पांढऱ्या तुरीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. जालना बाजारात तुरीला 6 हजार 336 ते 7 हजार 580 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. दरम्यान, छत्रपती संभाजी नगर मार्केटमध्ये आलेल्या काळ्या तुरीला 8 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाला आहे. मंगळवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज तुरीच्या सर्वाधिक दरात घट झाल्याचे दिसून येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
तुरीचे दर घसरले, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल