IND vs NZ : दोघांच्या जीवावर वर्ल्ड कप जिंकणार? 238 रन करूनही टीम इंडियासाठी धोक्याची घंटा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने मोठा स्कोअर केला आहे, पण एवढा स्कोअर करूनही भारतीय टीमसाठी वर्ल्ड कपच्या तोंडावर धोक्याची घंटा वाजली आहे.
advertisement
1/6

भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 238 रन केले. टी-20 क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्तचा स्कोअर हा चांगला मानला जातो.
advertisement
2/6
200 पेक्षा जास्त रन करूनही भारतीय टीमची चिंता वाढली आहे, कारण अभिषेक शर्मा वगळता कोणालाही मोठा स्कोअर करता आला नाही. या सामन्यातही टीम इंडियाची टॉप ऑर्डर अपयशी ठरली. अभिषेक शर्माने 35 बॉलमध्ये 240 च्या स्ट्राईक रेटने 84 रन केले, ज्यात 8 सिक्स आणि 5 फोरचा समावेश होता.
advertisement
3/6
टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर भारताने शुभमन गिलला टीमबाहेर करून संजू सॅमसनला संधी दिली आणि इशान किशनला टीममध्ये आणलं. पण या सामन्यात संजू 10 रनवर आणि इशान किशन 8 रनवर आऊट झाला.
advertisement
4/6
कर्णधार सूर्यकुमार यादव हा मागच्या काही काळापासून संघर्ष करत आहे, पण या सामन्यात त्याला सूर गवसला. असं असलं तरी सूर्याला अर्धशतक करता आलं नाही. 22 बॉलमध्ये 32 रन करून सूर्यकुमार यादव आऊट झाला.
advertisement
5/6
हार्दिक पांड्याने 16 बॉलमध्ये 25 आणि शिवम दुबेने 4 बॉलमध्ये 9 रन केले. तर अक्षर पटेल 5 रनवर आऊट झाला. फिनिशर म्हणून टीममध्ये आलेल्या रिंकू सिंगने 20 बॉलमध्ये 220 च्या स्ट्राईक रेटने 44 रनची आक्रमक खेळी केली. रिंकूने 3 सिक्स आणि 4 फोर मारले.
advertisement
6/6
7 फेब्रुवारीपासून भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे, पण त्याआधी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने चिंता वाढवली आहे. ओपनर अभिषेक शर्मा आणि फिनिशर रिंकू सिंग या दोघांवरच अवलंबून राहून वर्ल्ड कप ट्रॉफी कशी जिंकणार? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : दोघांच्या जीवावर वर्ल्ड कप जिंकणार? 238 रन करूनही टीम इंडियासाठी धोक्याची घंटा!