TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा हवा बदल, गुरुवारी 'तो' परत येतोय, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 22 जानेवारी रोजी राज्यातील काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस तापमान तुलनेने जास्तच राहणार आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रात पुन्हा हवा बदल, गुरुवारी 'तो' परत येतोय, या जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात सध्या ढगाळ वातावरणाचा प्रभाव वाढल्यामुळे तापमानात वाढ नोंदवली जात आहे. परिणामी, मागील काही दिवसांपासून जाणवत असलेला थंडीचा कडाका बऱ्यापैकी कमी झाला आहे. सकाळी आणि रात्री काही भागांत सौम्य गारवा जाणवत असला, तरी दिवसा उष्णतेचा त्रास वाढत असल्याचं चित्र आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 22 जानेवारी रोजी राज्यातील काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस तापमान तुलनेने जास्तच राहणार आहे. राज्यातील सर्वच ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले आहे. पाहुयात, 22 जानेवारी रोजी राज्यातील हवामान कसं राहील.
advertisement
2/7
कोकण विभागासह राज्यातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईत दिवसभर धुक्यासह अंशतः ढगाळ आकाश राहील. पावसाची शक्यता नाही, मात्र उष्णतेचा प्रभाव जाणवू शकतो. येथे कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळी हलकं धुकं आणि दुपारनंतर उकाडा जाणवू शकतो.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातही तापमानात वाढ झाली असून मिश्र हवामानाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि परिसरात सकाळच्या वेळेत धुकं पडण्याची शक्यता असून दिवसभर हवामान अंशतः ढगाळ राहील. येथे कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. सकाळी गारवा तर दुपारी उष्णतेचा अनुभव नागरिकांना येऊ शकतो.
advertisement
4/7
मराठवाडा विभागात सकाळी धुके आणि त्यानंतर हवामान निरभ्र होण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पहाटे धुकं पडेल, मात्र दुपारनंतर आकाश स्वच्छ राहील. येथे कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्रीचा गारवा कमी झाल्याचं जाणवत आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने ढगाळ राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात दिवसभर सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. नाशिकमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. तापमानात फारसा बदल जाणवणार नसून दिवस उष्ण राहण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भातही तापमानात वाढ नोंदवली जात असून ढगाळ हवामानाचा प्रभाव कायम आहे. नागपूरमध्ये दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहील. येथे कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे. सकाळी आणि रात्री सौम्य गारवा जाणवेल, तर दुपारी उष्णता वाढू शकते.
advertisement
7/7
राज्यातील वातावरणात पुन्हा बदल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‎
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा हवा बदल, गुरुवारी 'तो' परत येतोय, या जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल