हिंदू धर्मात मृत्यूनंतर 10 दिवस का लावतात दिवा? ज्योत विझली तर काय होतं?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
हिंदू धर्मात व्यक्ती मरण पावलेल्या दिवसापासून पुढचे दहा दिवस तिच्या नावे पीठ पसरून त्यावर दिवा तेवत ठेवला जातो.
advertisement
1/10

हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या घरी त्या व्यक्तीच्या नावे दहा दिवसांसाठी एक दिवा किंवा पणती तेवत ठेवण्याची परंपरा आहे. व्यक्ती मरण पावलेल्या दिवसापासून पुढचे दहा दिवस तिच्या नावे पीठ पसरून त्यावर दिवा तेवत ठेवला जातो.
advertisement
2/10
बऱ्याचदा मृत व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून हा दिवा लावतात अशी अंधश्रद्धा बाळगली जाते. मात्र हा असा दिवा लावण्यामागे नेमके काय कारण आहे याबाबद्दलच कोल्हापुरातील पुरोहित कृष्णात गुरव यांनी माहिती सांगितली आहे.
advertisement
3/10
खरंतर पुनर्जन्मसिद्धांत आणि परलोकविद्या अशा गोष्टींची परिपूर्णता असणारा संपूर्ण जगामध्ये हिंदू धर्म हा एकमेव धर्म आहे. त्यामुळेच जन्मावेळी गर्भप्रविष्ट आत्म्याचे स्वागत आणि मृत्यूनंतर आत्म्याचे सन्मानाने निरोप असे दोन्ही वेळी विविध संस्कार केले जातात.
advertisement
4/10
यामध्ये बीजारोपण, भ्रूण, बालक अशा जन्माच्या विविध टप्प्यांवर संस्कार केले जातात, तर निधन होताच एकीकडे शवदहन, अस्थिमेलन ह्या पद्धतीने अंत्यसंस्कार, तर दुसरीकडे त्या व्यक्तीच्या घरी प्रतीकात्मकरीत्या चैतन्यमय आत्मस्वरुपी दिव्याची स्थापना केली जाते, असे पुरोहित कृष्णात गुरव यांनी सांगितले आहे.
advertisement
5/10
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे घरी धान्याच्या गोलाकार पिठावर एक पणती दहा दिवस ठेवतात. त्या दिव्याशेजारी पहिल्या दिवशी पाण्याचे एक पात्र तर दुसऱ्या दिवसापासून भोजनाच्या वेळी भाताचा पिंड वा दुधाची वाटीही ठेवली जाते. असे मानले जाते की दहा दिवसांपर्यंत केल्या जाणाऱ्या अवयवश्राद्धांनी लिंगदेहाची परिपूर्ती होते.
advertisement
6/10
दहाव्या दिवशी नदीवर क्रियाकर्माच्या ठिकाणी घरातील तो दिवा नेऊन विसर्जित केला जातो. त्यामुळे नऊ दिवसांमध्ये पूर्णत्वास आलेला लिंगदेह चैतन्यमय होतो आणि त्या प्रेतात्म्याचा पुढील परलोकप्रवास सुरू होतो, अशी संकल्पना असल्याचेही गुरव यांनी सांगितले.
advertisement
7/10
काही जण असेही मानतात की, पूर्वीच्या काळी फोटो काढण्याची सोय नसल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याचे प्रतीक म्हणून आत्मज्योत अर्थात दिवा लावतात. मात्र असा दिवा लावण्याबाबत समाजामध्ये काही चुकीच्या समजुती देखील प्रचलित आहेत.
advertisement
8/10
सर्वदूर असा समज आहे की, त्या दिव्याखाली असणाऱ्या पिठावर मृत व्यक्तीला पुढे कोणता जन्म मिळाला असेल, त्याची पावले उमटतात. ही समजूत चुकीची आहे. कारण पणतीखाली पिठावर उमटलेली आकृती पणतीच्या खडबडीत तळामुळे तयार झालेली असते. त्या आकृतीचा परलोकाशी वा पुनर्जन्माशी काहीच संबंध नसतो, असे कृष्णात गुरव सांगतात.
advertisement
9/10
दरम्यान, काही अपरिहार्य कारणास्तव दहा दिवसांऐवजी एक दिवसच दिवा ठेवावा लागला, तरी हरकत येत नाही. तर दहा दिवसांच्या काळात दिवा चुकून विझला तरी पुन्हा प्रज्वलित करावा. त्यात कोणताही दोष वा अपशकून नसतो, असे देखील गुरव यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
10/10
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
हिंदू धर्मात मृत्यूनंतर 10 दिवस का लावतात दिवा? ज्योत विझली तर काय होतं?