TRENDING:

T20 World Cup 2026 साठी टीमची घोषणा! विराटच्या कट्टर दुश्मनाची स्कॉडमध्ये एन्ट्री, पाहा 15 खेळाडू कोण?

Last Updated:
Afghanistan Squad for T20 World Cup 2026 : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) आयसीसी मेन्स T20 वर्ल्ड कपसाठी आपल्या 15 सदस्यीय टीमची घोषणा केली असून राशिद खान याच्याकडे कॅप्टन म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
advertisement
1/7
T20 World Cup 2026 साठी टीमची घोषणा! विराटच्या कट्टर दुश्मनाची एन्ट्री
T20 वर्ल्ड कप 2026 ही स्पर्धा 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 या कालावधीत भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवली जाणार आहे. अशातच आता सर्व संघांची घोषणा होताना दिसतीये.
advertisement
2/7
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) आयसीसी मेन्स T20 वर्ल्ड कप 2026 साठी आपल्या 15 सदस्यीय टीमची घोषणा केली असून राशिद खान याच्याकडे कॅप्टन म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
advertisement
3/7
टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी अफगाणिस्तानच्या टीममध्ये अनुभवी ऑलराउंडर गुलबदीन नैब आणि विराट कोहलीचा कट्टर दुश्मन वेगवान बॉलर नवीन-उल-हक यांचे पुनरागमन झालं आहे.
advertisement
4/7
गुलबदीन आणि नवीन उल हक हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे काही काळ इंटरनॅशनल क्रिकेटपासून लांब होते, मात्र आता त्यांच्या एन्ट्रीमुळे अफगाणिस्तानची ताकद वाढली आहे.
advertisement
5/7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने गेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये 2024 सेमीफायनलपर्यंत मजल मारून इतिहास रचला होता. तोच आत्मविश्वास कायम राखण्यासाठी टीमने इब्राहिम जादरानला उपकर्णधार बनवलं आहे.
advertisement
6/7
तर रहमानुल्लाह गुरबाज आणि मोहम्मद इशाक यांच्याकडे विकेटकीपर म्हणून जबाबदारी दिली आहे. याशिवाय एएम गजनफर, इजाज अहमदजई आणि जिया उर रहमान शरीफी या तीन खेळाडूंना रिझर्व्ह म्हणून संघात स्थान मिळालं.
advertisement
7/7
अफगाणिस्तानचा संपूर्ण स्क्वॉड - राशिद खान (कॅप्टन), इब्राहिम जादरान (वाईस कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), मोहम्मद इशाक (विकेटकीपर), सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, शाहिदुल्लाह कमाल, अजमतुल्लाह उमरजई, गुलबदीन नैब, मोहम्मद नबी, नूर अहमद, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, फजल हक फारूकी आणि अब्दुल्ला अहमदजई.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup 2026 साठी टीमची घोषणा! विराटच्या कट्टर दुश्मनाची स्कॉडमध्ये एन्ट्री, पाहा 15 खेळाडू कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल