Asia Cup : पाकिस्तानचं काही खरं नाही, रविवारी धडाडणार टीम इंडियाच्या 2 तोफा, सूर्याने खेळला मास्टरस्ट्रोक!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये टीम इंडियाचा सामना ओमानविरुद्ध होत आहे. स्पर्धेत सुपर-4 च्या टीम आधीच निश्चित झाल्या आहेत, त्यामुळे भारतासाठी या सामन्यात चांगली प्रॅक्टिस होऊ शकते. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही टॉसवेळी अशीच प्रतिक्रिया दिली.
advertisement
1/5

पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये आम्ही पहिले बॉलिंग केली, त्यामुळे या सामन्यात बॅटिंग करून आमच्या बॅटिंगची खोली किती आहे, हे पाहण्याची संधी असल्याचं सूर्यकुमार यादव टॉसवेळी म्हणाला आहे.
advertisement
2/5
आशिया कपच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला. भारताने युएईविरुद्धचा पहिला सामना 9 विकेटने आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना 7 विकेटने जिंकला. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या खालच्या क्रमांकाच्या बॅटरना बॅटिंगची संधी मिळाली नाही.
advertisement
3/5
आशिया कपच्या सुपर-4 मध्ये भारताचे सामने पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यांआधीच भारताने सुपर-4 ची रणनीती आखली आहे. या रणनीतीचा भाग म्हणूनच टीम इंडिया ओमानविरुद्धच्या सामन्यात खेळत आहे.
advertisement
4/5
ओमानविरुद्धच्या सामन्यात कॅप्टन सूर्याने टीम इंडियात दोन बदल केले आहेत. हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग या दोघांना स्पर्धेत पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे, पण हा सगळा प्लान सुपर-4 च्या मॅचसाठी आखण्यात आला आहे.
advertisement
5/5
सुपर-4 मध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना 21 सप्टेंबरला, बांगलादेशविरुद्ध 24 सप्टेंबरला आणि श्रीलंकेविरुद्ध 26 सप्टेंबरला होणार आहे. सुपर-4 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या 2 टीम 28 सप्टेंबरला आशिया कपच्या फायनलमध्ये खेळतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Asia Cup : पाकिस्तानचं काही खरं नाही, रविवारी धडाडणार टीम इंडियाच्या 2 तोफा, सूर्याने खेळला मास्टरस्ट्रोक!