TRENDING:

Asia Cup U-19: वैभव सूर्यवंशी नाही तर या मुंबईकर खेळाडूवर BCCI ने दाखवला विश्वास, दिली टीमची जबाबदारी

Last Updated:
सलामीवीर म्हणून अभिजान कुंडू आणि हरवंश सिंग (विकेटकीपर) हे फलंदाज संघाला चांगली सुरुवात करून देण्यास उत्सुक असतील.
advertisement
1/6
Asia Cup  U-19:वैभव सूर्यवंशी नाही तर या मुंबईकर खेळाडूवर BCCI ने दाखवला विश्वास
क्रिकेटविश्वातून आताची सर्वात मोठी बातमी येत आहे. BCCI ने अंडर-19 साठी टीम इंडियाची निवड केली आहे. या निवडीदरम्यान काही बदल देखील केले आहेत. तर कर्णधार देखील बदलला असून नव्या खेळाडूकडे महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
advertisement
2/6
महाराष्ट्राचा फलंदाज आयुष म्हात्रे याच्या खांद्यावर टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयुष अंडर-19 चा कॅप्टन असणार आहे. त्याचबरोबर, विहान मल्होत्रा याची व्हाइस कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली. या तरुण खेळाडूंना भविष्यातील मोठ्या संधींसाठी स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.
advertisement
3/6
वैभव सूर्यवंशी, युवराज गोहिल आणि वेदांत त्रिवेदी यांसारखे महत्त्वाचे खेळाडू अंतिम १५ मध्ये आहेत. त्याचबरोबर, सलामीवीर म्हणून अभिजान कुंडू आणि हरवंश सिंग (विकेटकीपर) हे फलंदाज संघाला चांगली सुरुवात करून देण्यास उत्सुक असतील. खिशात संधी घेऊन मैदानात उतरणाऱ्या या युवा खेळाडूंवर देशाचे भविष्य अवलंबून आहे.
advertisement
4/6
या महत्त्वाकांक्षी स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात एकूण १५ खेळाडू आणि ४ स्टँडबाय खेळाडूंचा समावेश आहे. राहुल कुमार, हेमचुदेशन जे, बी.के. किशोर, आदित्य रावत हे खेळाडू स्टॅण्डबाय म्हणून राहणार आहेत.
advertisement
5/6
टीम इंडिया- आयुष म्हात्रे (कॅप्टन), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा (व्हाइस कॅप्टन), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंग (विकेटकीपर), युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, नमन पुष्पक, डी. दीपेश, हेनिल पटेल, किशन कुमार सिंग, उदव मोहन, अॅरोन जॉर्ज.
advertisement
6/6
हा आशिया चषक १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. या स्तरावर चांगली कामगिरी केल्यास, टीम इंडियाकडून खेळण्याची संधी आणि आयपीएलमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. आयुष म्हात्रे कोणती रणनिती वापरून टीम इंडियाला विजय मिळवून देणार याकडे लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Asia Cup U-19: वैभव सूर्यवंशी नाही तर या मुंबईकर खेळाडूवर BCCI ने दाखवला विश्वास, दिली टीमची जबाबदारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल