BCCI Annual Contracts : रोहित आणि विराटचं डिमोशन, शुभमनलाही मिळणार नाही प्रमोशन! सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये कुणाचे खिसे कापणार?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
BCCI Central Annual Contracts list : बीसीसीआय वार्षिक करार यादीत सर्वात वरची 'ग्रेड ए प्लस' कॅटेगरी पूर्णपणे बंद करण्याचा विचार सध्या बीसीसीआय करत आहे. अजित अगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने या बदलाची शिफारस केली आहे.
advertisement
1/7

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सिस्टिममध्ये मोठे फेरबदल करण्याची तयारी सुरू केली आहे. या नव्या प्रस्तावामुळे भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंच्या मानधनावर आणि श्रेणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
2/7
बीसीसीआय वार्षिक करार यादीत सर्वात वरची 'ग्रेड ए प्लस' कॅटेगरी पूर्णपणे बंद करण्याचा विचार सध्या बीसीसीआय करत आहे. अजित अगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने या बदलाची शिफारस केली आहे.
advertisement
3/7
जर या नव्या मॉडेलला अंतिम मंजुरी मिळाली, तर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि अनुभवी कर्णधार रोहित शर्मा यांचे डिमोशन होऊ शकते. सद्यस्थितीत हे दोन्ही खेळाडू सर्वोच्च श्रेणीत आहेत, मात्र नव्या नियमांनुसार त्यांना थेट 'ग्रेड-बी' मध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
4/7
प्रस्तावानुसार, आता केवळ ए, बी आणि सी अशा तीनच श्रेणी शिल्लक राहतील. सध्याच्या 7 कोटी रुपयांच्या 'ए प्लस' श्रेणीतील ४ खेळाडूंमध्ये रोहित, विराटसह जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे.
advertisement
5/7
बीसीसीआयच्या पुढील बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे खेळाडूंच्या वार्षिक कमाईत मोठी घट होऊ शकते. बीसीसीआयच्या नियमानुसार, एका सत्रात ठराविक संख्येने टेस्ट, वनडे किंवा टी-२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंनाच करारात स्थान दिले जाते.
advertisement
6/7
हर्षित राणासारख्या तरुण खेळाडूंना बोर्डाने आधी काही सवलती दिल्या होत्या. मात्र, आता वरिष्ठ खेळाडूंच्या बाबतीत बोर्ड कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. या बदलामुळे युवा खेळाडूंना अधिक संधी मिळतील, असा तर्क लावला जात आहे.
advertisement
7/7
दरम्यान, विराट आणि रोहितसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंना खालच्या श्रेणीत टाकण्याच्या चर्चेमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हे नवे मॉडेल नेमके कधीपासून लागू होणार, याकडे संपूर्ण क्रिडाविश्वाचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
BCCI Annual Contracts : रोहित आणि विराटचं डिमोशन, शुभमनलाही मिळणार नाही प्रमोशन! सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये कुणाचे खिसे कापणार?