CSK vs RR : पावरप्ले नाही तर 8 च्या ओव्हरमध्ये CSK च्या हातातून निसटली मॅच, पहिल्या 20 मिनिटात चेन्नईचा गेम!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
CSK vs RR Match Turning Point : राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जला चांगली कामगिरी करता आली नाही अन् पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. अशातच मॅच कुठं फिरली? जाणून घ्या.
advertisement
1/5

चेन्नईच्या बॅटिंगची सुरुवातच खराब झाली होती. दुसऱ्याच ओव्हरमध्ये संजू सॅमसनची विकेट गेली. त्याला चांगली सुरूवात करून देता आली नाही. तर तिसऱ्याच ओव्हरमध्ये ऋतुराजही आऊट झाला.
advertisement
2/5
पहिल्या दोन विकेटनंतर सीएसकेला चांगला स्ट्राईक रेटसह विकेट टिकवण्याची देखील गरज होती. मात्र, आयुष म्हात्रे याला एकही धाव करता आली नाही. तो गोल्डन डक झाला.
advertisement
3/5
तीन ओव्हरमध्येच खराब सुरुवात मिळाल्यानंतर पहिल्या 20 मिनिटातच चेन्नईला मोठा निर्णय घ्यावा लागला. चेन्नईने पहिल्याच इनिंगमध्ये आपला इम्पॅक्ट प्लेयर पाठवला.
advertisement
4/5
सरफराज खानला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून पाठवल्यानंतर त्याने दोन ओव्हर आपला जलवा दाखवला पण अनुभवी जडेजासमोर सरफराजचा टिकाव लागला नाही.
advertisement
5/5
पावरप्लेमध्ये चेन्नईवर दबाव आल्यावर रियान परागने प्लॅन चेंज केला. सामन्याच्या 8 व्या ओव्हरमध्ये जडेजाने मॅच फिरवली. सरफराज आणि शिवम दुबेची विकेट राजस्थानला मिळाली अन् चेन्नईचा डाव गडगडला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
CSK vs RR : पावरप्ले नाही तर 8 च्या ओव्हरमध्ये CSK च्या हातातून निसटली मॅच, पहिल्या 20 मिनिटात चेन्नईचा गेम!