TRENDING:

राष्ट्रीय पुरस्कार पटकावला तरी सोशल मीडिया ठरतोय अडचण! 'नाळ 2'च्या 'चिमी'ला कोणी फिल्म देईना; त्रिशा ठोसरच्या आईने व्यक्त केली नाराजी

Last Updated:
Naal 2 Treesha Thosar : नाळ 2 फिल्ममधील चिमी म्हणजे त्रिशा ठोसर जिने खूप कमी वयात राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. पण तरी सोशल मीडियामुळे तिला आता नवे प्रोजेक्ट्स मिळेनासे झाले आहेत.
advertisement
1/7
राष्ट्रीय पुरस्कार पटकावला तरी सोशल मीडिया ठरतोय अडचण! 'नाळ 2'च्या 'चिमी'ला कोणी फिल्म देईना
'नाळ 2' चित्रपटातील चित्रपटातील चिमी तुम्हाला आठवतेय का? गोंडस चेहरा आणि तिची गोड एक्टिंग कोण कशी काय विसरू शकतं?  चिमीची भूमिका साकारणारी ही मराठमोळी बालकलाकार त्रिशा ठोसर, जिने फिल्ममधून सगळ्यांचं मन जिंकलंच, सगळ्यांच्या मनात घर केलंच पण तिने राष्ट्रीय पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं.
advertisement
2/7
वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्रिशा ठोसरने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'नाळ 2' चित्रपटातील या 'चिमी'च्या भूमिकेसाठी त्रिशाला राष्ट्रपती द्रौपदी नामुर्मू यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. एवढ्या लहान वयात हा मान मिळवणारी त्रिशा कमल हसन यांच्यानंतर दुसरी बालकलाकार आहे.
advertisement
3/7
याशिवाय तिला बीसीआयएफएफ गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पेशल ज्युरी मेन्शन, झी चित्र गौरव, फिल्मफेअर, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. नुकतंच तिला महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमासाठी तिला 'मटा सन्मान 2026' मध्ये लक्षवेधी कामगिरी म्हणून सन्मानित करण्यात आलं. अशा अनेक सन्मानांनी तिच्या कामाची दखल घेतली आहे.
advertisement
4/7
पण राष्ट्रीय पुरस्कार विजेती असूनही त्रिशा ठोसरसमोर सोशल मीडिया सगळ्यात मोठी अडचण ठरली आहे. सोशल मीडियामुळे तिला कोणतेच नवीन प्रोजेक्ट्स मिळेनासे झालेत. तिला कुणीच फिल्म किंवा वेब सीरिजमध्ये घ्यायला तयार नाही. त्रिशाची आई गौतमीठोसरने हा कटु अनुभव सांगत नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
5/7
गौतमीने सांगितलं, "तुमच्या मुलीचे सोशल मीडिया फॉलोअर्स किती? फॉलोअर्स कमी आहेत, अशी वाक्य मला वारंवार ऐकायला मिळाली. त्रिशा स्वतः मोबाइल वापरत नाही. तिचं सोशल मीडिया अकाउंटही मीच सांभाळते. सतत सोशल मीडियावर सक्रिय राहणं, हे तिच्या वयासाठी योग्य नाही. तिला तिचं बालपण जगू द्यावं, शिकू द्यावं आणि अभिनयातून स्वतःची ओळख निर्माण करू द्यावी, हीच आमची भूमिका आहे."
advertisement
6/7
त्रिशाची आई त्रिशाच्या सिनेमाच्या प्रमोशनल गोष्टी किंवा पुरस्कारांची माहितीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करते.  त्रिशाची आई गौतमी ठोसर म्हणाली, "आजकाल लहान मुलांकडूनही सतत व्हिडिओ बनवणं, कंटेंट तयार करणं, फॉलोअर्स वाढवणं याची अपेक्षा ठेवली जाते, पण आम्हाला त्या शर्यतीत नाही धावायचं.  माझी मुलगी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हावी, अशी आमची अजिबात इच्छा नाही. तिचं मुख्य लक्ष अभिनय आणि शिक्षणावर असायला हवं, असंच आम्हाला वाटतं"
advertisement
7/7
"त्रिशा एक बालकलाकार आहे. चित्रपटांमधील भूमिका, सेटवरील अनुभव आणि त्यातून शिकणं हीच तिची खरी ओळख आहे.  आम्हाला तिच्या अभिनय कौशल्यावर विश्वास आहे. फॉलोअर्सच्या आकड्यांमागे धावण्यापेक्षा ती एक उत्तम अभिनेत्री बनावी, हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे", असं तिच्या आईने सांगितलं. एकीकडे 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणण्याची चर्चा जोर धरत असताना अशा बालकलाकारांकडून फॉलोअर्स हा निकष पुढे येत असल्याने प्रश्न निर्माण होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राष्ट्रीय पुरस्कार पटकावला तरी सोशल मीडिया ठरतोय अडचण! 'नाळ 2'च्या 'चिमी'ला कोणी फिल्म देईना; त्रिशा ठोसरच्या आईने व्यक्त केली नाराजी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल