TRENDING:

Ranji Trophy : मुंबईची वाईट अवस्था, राजस्थानचा खेळाडू एकटा पुरून उरला, डबल सेंचुरीने वाढवली जयस्वाल-मुशीरची डोकीदुखी

Last Updated:
सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई आणि राजस्थान यांच्यात सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबईची वाईट अवस्था पाहायला मिळाली. राजस्थानच्या फलंदाजांनी मुंबईला अडचणीत आणले.
advertisement
1/7
मुंबईला एकटा पुरून उरला, जयस्वाल-मुशीर खानची वाढवली डोकीदुखी, ठोकली डबल सेंचुरी
सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई आणि राजस्थान यांच्यात सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबईची वाईट अवस्था पाहायला मिळाली. राजस्थानच्या फलंदाजांनी मुंबईला अडचणीत आणले. विकेट घेताना मुंबईचे गोलंदाज थकले होते.
advertisement
2/7
राजस्थानविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात मुंबईची अवस्था बिकट झाली आहे. राजस्थानने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईचा पहिल्या इनिंगमध्ये 254 रनवर ऑलआऊट झाला, त्यानंतर राजस्थानने 617/6 रवरन डाव घोषित केला. पण मुंबईसाठी एक खेळाडू डोकेदुखी ठरला.
advertisement
3/7
मुंबई आणि राजस्थान यांच्यात सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात दीपक हुड्डाने चांगली कामगिरी केली. या फलंदाजाने काल तिसऱ्या दिवशी जिथे खेळ सोडला होता तिथूनच सुरुवात केली.
advertisement
4/7
परंतु प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या दुसऱ्या 250+ धावसंख्येपासून तो फक्त दोन धावांनी दूर राहिला. तथापि, रणजी ट्रॉफी ग्रुप डी सामन्यात त्याने राजस्थानला मुंबईवर 363 धावांची मोठी आघाडी मिळवून दिली.
advertisement
5/7
राजस्थानने आपला डाव 617/6 वर घोषित केला, त्यानंतर मुंबईने दिवसअखेर यशस्वी जयस्वाल आणि मुशीर खान यांच्या नाबाद सलामी जोडीच्या जोरावर एकही बाद न होता 89 धावा केल्या.
advertisement
6/7
हुडाने डाव सावरला, तर तरुण कार्तिक शर्माने चौकार आणि षटकारांसह त्याचे दुसरे प्रथम श्रेणी शतक पूर्ण केले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 265धावांची मोठी भागीदारी केली.
advertisement
7/7
शेवटच्या सत्रात फलंदाजीसाठी उतरताना, मुंबईला कोणताही धक्का बसला नाही. जयस्वालने 100 च्या स्ट्राईक रेटने आणखी एक अर्धशतक झळकावले, तर मुशीरने प्रत्येक चेंडू त्याच्या गुणवत्तेनुसार खेळला. राजस्थान भलेही मजबूत स्थितीत असेल, परंतु मुंबई हार मानण्यास तयार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : मुंबईची वाईट अवस्था, राजस्थानचा खेळाडू एकटा पुरून उरला, डबल सेंचुरीने वाढवली जयस्वाल-मुशीरची डोकीदुखी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल