पोरीजवळ थोडावेळ थांबला आणि त्यानंतर घरी जायला निघाला. पण बाप घरी न पोहोचल्याने लेकीचा जीव कासावीस झाला. वाट पाहिली, दिवस सरला पण वडील काही केल्या घरी पोहोचेना, कुठे राहिले? वाट पाहिली, चौकशी केली. पोरीचा जीव आता कासावीस झाला.
मनात नको नको ते विचार येऊ लागली. तरी धीर धरुन वडील घरी येतील असा विचार ती करत राहिली. नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. वडील काही घरी परतलेच नाहीत. अखेर मुलगी आणि जावई वडिलांना शोधण्यासाठी बाहेर पडले. कुठेच न सापडल्याने अखेर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार करण्यासाठी मुलगी आणि जावई पोहोचले. त्यांनी पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. 31 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
advertisement
पोलिसांनी शोध घेतल्यानंतर सोमवारी वडिलांचा मृतदेह आढळून आला. याची माहिती तातडीनं मुलगी आणि जावयाला देण्यात आली. मुलीला भेटून घरी निघालेले असताना विहिरीत पडून मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. अशोक गायकवाड वय 43 असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी खुलादाबाद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 27 ऑक्टोबर रोजी सोनखेड इथे ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले. मात्र तीन दिवस उलटूनही ते घरी परतले नाहीत.
मुलीने आणि जावयाने वडिलांची शोधाशोध केली. अखेर पोलीस ठाणे गाठलं. सोमवारी सोनखेडा परिसरात साहेबराव वाकळे यांच्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ते विहिरीत कसे पडले? कोणी त्यांना पडलं की ते त्यांनी आयुष्य संपवलं की त्यांच्यासोबत काही घडलं याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे मुलीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
