यावर माईसाहेब डॉ. सविता भीमराव आंबेडकर हा चित्रपट साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाला फ्रान्समधील प्रतिष्ठित कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बेस्ट इंडियन फिल्म अवॉर्ड जाहीर झाला असल्याची माहिती सुप्रसिद्ध नाटककार, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते प्रकाश त्रिभुवन यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
Cotton Thrown: अवकाळीमुळे वेचणीचा कापूस भिजला, मराठवाड्यात शेतकऱ्याचा उद्रेक; रस्त्यावर उधळला कापूस
advertisement
माईसाहेब डॉ. सविता भीमराव आंबेडकर या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी पूर्ण 3 वर्षे लागली आहे. माईसाहेबांवरील हा पहिलाच चित्रपट असल्याने साहित्य आणि ऐतिहासिक संदर्भ मिळवणे कठीण गेले. माईसाहेबांना बाबासाहेबांच्या निधनानंतर पंधरा वर्षे अज्ञातवासात राहावे लागले. या सर्व घटनांची माहिती घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. सेन्सॉर बोर्डाकडे या विषयाचे तज्ज्ञ नसल्याने चित्रपटाला 6 महिन्यांच्या अधिक कालावधीनंतर परवानगी मिळाली, असे देखील त्रिभुवन यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कलावंतांची कमी नाही, खूप हुशार मुले आहेत, मराठवाड्यातील देखील नवीन मुले चित्रपट, नाटक, संगीत क्षेत्रात दिसत आहेत. त्यामुळे यानंतर देखील चित्रपट सृष्टीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्राचे ज्ञान घ्यावे. त्यामध्ये ड्रामॅटिक, फिल्म मेकिंग हे सर्व कोर्स छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई येथे उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टींचे शिक्षण घेतले पाहिजे. मेहनत घेतली पाहिजे यश नक्की मिळते, असे देखील त्रिभुवन म्हणाले.





