IPL 2026 Auction : शाहरुखने धोका दिला, ऑक्शनच्या 3 तास आधी पठ्ठ्यानं दाखवला जलवा! वादळी खेळी करून वाढवला 'भाव'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Venkatesh Iyer in IPL 2026 Auction : कोलकाता नाईट रायडरने व्यंकटेश अय्यरला रिलीज केलं होतं. आता त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वादळी खेळी केलीये.
advertisement
1/4

इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावाच्या अवघ्या काही तास आधी, भारतीय ऑलराऊंडरॉ खेळाडू व्यंकटेश अय्यर याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) स्पर्धेत तुफान फलंदाजी केली आहे.
advertisement
2/4
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने त्याला मागच्या वर्षी २३.७५ कोटींच्या मोठ्या रकमेत विकत घेतल्यानंतर करारमुक्त केले होते. त्यानंतर आता त्याच्यावर आज बोली लागेल.
advertisement
3/4
त्यामुळे, आयपीएल लिलावाच्या दिवशीच मध्यप्रदेश कडून खेळताना अय्यरने पंजाब विरुद्ध ४३ बॉलमध्ये ७० धावांची दमदार खेळी केली. यामध्ये त्याने ८ फोर आणि २ सिक्स मारले.
advertisement
4/4
पुण्यातील डीवाय पाटील अकादमीवर झालेल्या या सामन्यात, अय्यरची ही खेळी म्हणजे लिलावात उतरलेल्या फ्रँचायझींसाठी 'वेळेवर दिलेले परफेक्ट ऑडिशन' ठरली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 Auction : शाहरुखने धोका दिला, ऑक्शनच्या 3 तास आधी पठ्ठ्यानं दाखवला जलवा! वादळी खेळी करून वाढवला 'भाव'