Lionel Messi : मेस्सीच्या फॅन्सचा तुफान राडा, 10 मिनिटांतच सोडावं लागलं मैदान, नेमकं काय घडलं? पाहा PHOTO
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भारतात क्रिकेटचे जितके चाहते आहेत तितकेच चाहते फुटबॉलचे देखील आहेत. लिओनेल मेसी असो किंवा रोनाल्डो याबाबतीत नेहमीच भारतातील चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.
advertisement
1/7

भारतात क्रिकेटचे जितके चाहते आहेत तितकेच चाहते फुटबॉलचे देखील आहेत. लिओनेल मेसी असो किंवा रोनाल्डो याबाबतीत नेहमीच भारतातील चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.
advertisement
2/7
अशा परिस्थितीत भारतात फुटबॉल चाहत्यांसाठी एक मोठी आनंद देणारी बातमी होती ती म्हणजे लिओनेल मेसीचा 70 फूट उंच पुतळा. आणि लिओनेल मेसीला समोर पाहण. पण याच दरम्यान गदारोळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
3/7
कोलकात्यात लिओनेल मेस्सीचा 70 फुटांचा पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. मेस्सीनं स्वत:च्या पुतळ्याचं अनावरण केलं. लिओनेल मेस्सीला पाहण्यासाठी हजारो चाहत्यांची गर्दी जमली होती.
advertisement
4/7
कोलकाता येथे लिओनेल मेसी उपस्थित राहणार होता पण त्याला पाहता न आल्यामुळे चाहत्यांची निराशा झाली आणि ग्राउंडमध्ये एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली.
advertisement
5/7
लिओनेल मेस्सीची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या कार्यक्रमादरम्यान मैदानावर प्रचंड गर्दी झाली. लाडक्या मेस्सीला पाहायला न मिळाल्यानं आणि व्यवस्थापनातील कमतरतेमुळे चाहत्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला.
advertisement
6/7
निराश चाहत्यांनी मेस्सीच्या नावानं घोषणाबाजी केली, आयोजकांवर नाराजी व्यक्त केली आणि काहींनी मैदानावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. इतकाच नव्हे तर चाहते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पाण्याच्या बाटल्या फेकल्या, खुर्च्या मोडल्या आणि बॅनरही फाडले.
advertisement
7/7
या संपूर्ण प्रकारादरम्यान, मैदानात एवढा गोंधळ झाला की लिओनेल मेस्सीला चक्क सेक्युरिटीसह मैदान सोडावं लागलं. अवघ्या १० मिनिटांतच लिओनेल मेस्सी सॉल्ट लेक स्टेडियममधून बाहेर पडला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Lionel Messi : मेस्सीच्या फॅन्सचा तुफान राडा, 10 मिनिटांतच सोडावं लागलं मैदान, नेमकं काय घडलं? पाहा PHOTO