Gautam Gambhir : 'सॉरी बोलायची गरज नव्हती...', अर्शदिप-मिचेल वादावर गंभीर भडकला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आता वर्ल्ड कप समाप्तीनंतर गौतम गंभीरने अर्शदिप आणि मिचेलच्या मैदानातील भांडणावर भाष्य केले आहे.
advertisement
1/8

टीम इंडियाने रविवारी टी20 वर्ल्ड कप 2026 वर नाव कोरलं होतं. या फायनल सामन्या दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदिप सिंह आणि न्यूझीलंडचा बॅटसमन डेरील मिचेल यांच्यात वाद झाला होता.
advertisement
2/8
अर्शदिपच्या ओव्हरमध्ये डेरील मिचेलने दोन षटकार मारले होते. या षटकारानंतर अर्शदिपने रनआऊट करण्याच्या बहाण्याने बॉल थ्रो केला होता. हा बॉल जाऊन मिचेलच्या पायाला लागला होता. त्यामुळे मिचेल चांगलाच चवथाळला होता.
advertisement
3/8
या घटनेनंतर सूर्य कुमार यादवने मध्यस्थी केली होती.अंपायरने देखील अर्शदिपला वॉर्निंग दिली होती.त्यानंतर ओव्हरच्या समाप्तीनंतर अर्शदिपने मिचेलची माफी मागितली होती.
advertisement
4/8
दरम्यान अर्शदिपच्या या घटनेनंतर आयसीसीने त्याच्यावर कारवाई केली होती.आयसीसीने अर्शदिपला मॅच फिच्या 15 टक्के दंड ठोठावला होता. त्यासोबत त्याला एक डिमेरीट पॉइंटही देण्यात आला होता.
advertisement
5/8
दरम्यान आता वर्ल्ड कप समाप्तीनंतर गौतम गंभीरने अर्शदिप आणि मिचेलच्या मैदानातील भांडणावर भाष्य केले आहे.
advertisement
6/8
तुम्ही एका देशाचे नेतृत्व करता, त्यामुळे तुम्हाला आक्रामकपणा दाखवण्याचा अधिकार आहे.त्यामुळे त्याच्या वागण्यात मला काही चुकीच वाटलं नाही,असे गौतम गंभीर म्हणाला आहे.
advertisement
7/8
जर तुम्ही परत थ्रो मारता आहात,त्यात काही चुकीच नाही आहे.कोणत्याही बॉलरला दोन सिक्स मारलेले सहन होणार नाही आहेत.अशापरिस्थितीत त्याने असच वागलं पाहिजे अशी मी अपेक्षा करतो.त्यामुळे त्यात काही चुकीच नाही आहे,असे म्हणत गौतम गंभीरने अर्शदिपची पाठराखण केली.
advertisement
8/8
जर त्याने (अर्शदिपने मिचेलला) सॉरी जरी म्हटलं नसतं तरी मला चाललं असतं.त्याला सॉरी बोलायची गरजच नव्हती.तसेच ही चांगली गोष्ट आहे की त्याने त्याची माफी मागितली. क्रिकेटच्या मैदानात मित्र नसतात तर दुश्मन असतात.त्यामुळे तुमचं काम इतकचं आहे की देशाच प्रतिनिधित्व करणे,असे देखील गौतम गंभीर म्हणाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Gautam Gambhir : 'सॉरी बोलायची गरज नव्हती...', अर्शदिप-मिचेल वादावर गंभीर भडकला