TRENDING:

Hardik Pandya : 'गेल्या 50 दिवसांपासून मी...', प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाल्यानंतर हार्दिक पांड्या भावूक, 'आपलं कुटूंब जेव्हा...'

Last Updated:
Hardik Pandya : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात हार्दिक पांड्याने अफलातून कामगिरी करत भारताला विजय मिळून दिला.
advertisement
1/7
'गेल्या 50 दिवसांपासून...', प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाल्यानंतर हार्दिक भावूक
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-ट्वेंटी सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच' चा पुरस्कार पटकावल्यानंतर हार्दिक पांड्या याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.
advertisement
2/7
मॅचमधील अटीतटीच्या क्षणांचा उल्लेख करत, त्याने आपल्या खेळाडूपणाची बाजू आणि टीम इंडियासाठी खेळण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील टीमने हा विजय मिळवला आहे.
advertisement
3/7
पांड्या म्हणाला की, त्याला नेहमी आत्मविश्वासाने शॉट्स खेळायचे होते, पण त्याच वेळी विकेट मध्ये थोडी 'स्पाइस' होती, हेही जाणवले, त्यावेळी त्याने गेल्या 50 दिवसाच्या मेहनतीवर वक्तव्य केलं.
advertisement
4/7
पांड्या म्हणाला, तुम्ही थोडे धैर्याचे असणं आवश्यक होतं आणि जास्त बॉल तोडण्याचा प्रयत्न न करता केवळ टायमिंग साधण्यावर भर होता. गेले सहा-सात महिने त्याच्या फिटनेसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरले आहेत.
advertisement
5/7
आपलं कुटूंब दूर असताना 50 दिवस NCA मध्ये मेहनत घेतल्यावर, जेव्हा मैदानात सकारात्मक परिणाम दिसतो, तेव्हा खूप समाधान वाटतं असंही हार्दिक पांड्या म्हणाला.
advertisement
6/7
स्वतःच्या भूमिकेबद्दल बोलताना पांड्याने सांगितले की, मी बॅटिंग ऑर्डर किंवा माझ्या रोलबद्दल कधीही हट्टी राहिलो नाही. मला काय हवे आहे यापेक्षा टीम इंडियाला काय हवं आहे, हे अधिक महत्त्वाचे असते आणि या विचाराने त्याला नेहमी प्रेरित केले आहे.
advertisement
7/7
दरम्यान, जेव्हाही मला संधी मिळते, मी माझे उत्तम देण्याचा प्रयत्न करतो. काही दिवस चांगले असतात, काही नसतात, पण माझा माइंडसेट नेहमीच मदत करतो. मी माझ्या करिअरमध्ये नेहमीच टीम आणि देशाला प्राधान्य दिलं आहे, असंही पांड्या म्हणतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : 'गेल्या 50 दिवसांपासून मी...', प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाल्यानंतर हार्दिक पांड्या भावूक, 'आपलं कुटूंब जेव्हा...'
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल