TRENDING:

IND vs AUS : मुंबईचा पाचवा क्रिकेटर गंभीरच्या टार्गेटवर, दुसऱ्या T20 मध्ये शॉकिंग निर्णय, तुमचाही विश्वास बसणार नाही!

Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची सुरूवात अत्यंत खराब झाली आहे. 49 रनवर टीम इंडियाने 5 विकेट गमावल्या, पण त्यानंतर टीम मॅनेजमेंटने घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला.
advertisement
1/8
मुंबईचा पाचवा क्रिकेटर गंभीरच्या टार्गेटवर, दुसऱ्या T20 मध्ये शॉकिंग निर्णय!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर कांगारू बॉलरनी सुरूवातीपासूनच टीम इंडियाला धक्के दिले, त्यामुळे भारताची बॅटिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.
advertisement
2/8
शुभमन गिल 5 रनवर, संजू सॅमसन 2 रनवर, सूर्यकुमार यादव 1 रनवर , तिलक वर्मा शून्य आणि अक्षर पटेल 7 रनवर आऊट झाला. पाच विकेट पडल्यानंतर हर्षित राणा बॅटिंगला आला, त्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला.
advertisement
3/8
भारतीय टीममध्ये आशिया कपच्या फायनलचा मॅच विनर असलेला ऑलराऊंडर शिवम दुबे आहे, पण तरीही दुबेच्या वर हर्षित राणाला बॅटिंगला पाठवण्यात आलं. भारताने 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हाही दुबेने मॅच विनिंग खेळी केली होती. तसंच आयपीएलमध्येही सीएसकेकडून खेळणाऱ्या दुबेने धमाकेदार खेळी केल्या आहेत.
advertisement
4/8
आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळणारा शिवम दुबे हा मुंबईकडून स्थानिक आणि प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. मागच्या काही काळात मुंबईच्या खेळाडूंवर अन्याय केला जात आहे का? असा प्रश्नही चाहते विचारत आहेत.
advertisement
5/8
सात महिन्यांपूर्वी भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळून देणाऱ्या रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी अचानक वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून काढून टाकण्यात आलं, त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.
advertisement
6/8
आयपीएलच्या मागच्या काही मोसमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरलाही टी-20 फॉरमॅटमध्ये संधी दिली जात नाहीये. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआरने 2024 ची आयपीएल जिंकली, तसंच 2025 च्या आयपीएलमध्ये अय्यरने पंजाबलाही फायनलमध्ये पोहोचवलं.
advertisement
7/8
टेस्ट क्रिकेटमध्ये खोऱ्याने रन काढणारा मुंबईकर यशस्वी जयस्वाल याने आयपीएलमध्ये अनेकदा स्वत:ला सिद्ध केलं आहे, पण तरीही त्याला भारताकडून टी-20 क्रिकेट खेळायची संधी मिळत नाहीये.
advertisement
8/8
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मागचे काही मोसम सरफराज खान सातत्याने मोठे स्कोअर करत आहे, यानंतर त्याची भारताच्या टेस्ट टीममध्ये निवडही झाली, पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर सरफराजला अचानक टीममधून बाहेर करण्यात आलं. एवढच नाहीतर त्याची इंडिया ए साठीही निवड होत नसल्यामुळे निवड समितीवर टीका होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs AUS : मुंबईचा पाचवा क्रिकेटर गंभीरच्या टार्गेटवर, दुसऱ्या T20 मध्ये शॉकिंग निर्णय, तुमचाही विश्वास बसणार नाही!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल