IND vs ENG : सूर्यकुमार यादवने रचला इतिहास! बनला टीम इंडियाचा नंबर 1 टी-ट्वेंटी कॅप्टन, हिटमॅनलाही टाकलं मागे
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Suryakumar Yadav Team India No 1 captain : टीम इंडियाचा टी-ट्वेंटी कॅप्टन सूर्यकुमार यादव याने इतिहास रचला आहे. त्याने रोहित शर्माला मागे टाकत नंबर वनचं स्थान मिळवलंय.
advertisement
1/7

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर 8 फेरीतील टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. शेवटच्या मॅचमध्ये विजय मिळवत सूर्यकुमार यादवने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी पान लिहिलं आहे.
advertisement
2/7
रविवारी 1 मार्च रोजी झिम्बाब्वे विरुद्ध 5 विकेट्सनी मिळालेल्या या विजयासोबतच सूर्याने भारताचा सर्वात यशस्वी टी-20 कॅप्टन होण्याचा बहुमान मिळवला. यावेळी सूर्यान इतिहास रचला आहे.
advertisement
3/7
सूर्याने या बाबतीत रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांसारख्या महान दिग्गज खेळाडूंना मागं टाकलं आहे. गेल्या दोन वर्षात टीम इंडियाच्या सिरीज चांगल्या राहिल्यात.
advertisement
4/7
सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात पाऊल ठेवलं आणि 40 वा विजय नोंदवला. प्रत्येक 50 मॅच खेळणाऱ्या कॅप्टनच्या यादीत तो सर्वात यशस्वी कॅप्टन राहिला आहे.
advertisement
5/7
सूर्याकुमारने किमान 50 मॅचेसमध्ये कप्तानी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सूर्याचा विनिंग पर्सेंटेज आता 81.25 इतका झाला असून तो भारताचा नंबर वन कॅप्टन बनला आहे.
advertisement
6/7
या कामगिरीमुळे त्याने रोहित शर्माचा 79.83 टक्क्यांचा जुना रेकॉर्ड मोडीत काढून नवा इतिहास रचला आहे. जागतिक स्तरावर विचार केला तर सूर्यकुमार यादव आता जगातील दुसरा सर्वात यशस्वी टी-20 कॅप्टन ठरला.
advertisement
7/7
भारतातील सर्वात यशस्वी कॅप्टनच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली 64.58 टक्क्यांसह आणि चौथ्या क्रमांकावर 59.28 टक्क्यांसह महान कॅप्टन कूल एमएस धोनीचा समावेश आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : सूर्यकुमार यादवने रचला इतिहास! बनला टीम इंडियाचा नंबर 1 टी-ट्वेंटी कॅप्टन, हिटमॅनलाही टाकलं मागे