TRENDING:

Team India : टीम इंडियाला वर्ल्ड कपसाठी सापडला 'एक्स फॅक्टर', युवीसारखाच भारताला करणार वर्ल्ड चॅम्पियन!

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 101 रननी दणदणीत विजय झाला आहे. भारताने दिलेलं 176 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा 12.3 ओव्हरमध्ये 74 रनवरच ऑलआऊट झाला आहे.
advertisement
1/7
टीम इंडियाला सापडला 'एक्स फॅक्टर', युवीसारखाच भारताला करणार वर्ल्ड चॅम्पियन!
भारताकडून अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल यांना 2-2 विकेट मिळाल्या. तर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. डेवाल्ड ब्रेविस याच्या 22 रन वगळता दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्याच खेळाडूला मोठा स्कोअर करता आला नाही.
advertisement
2/7
या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाची अवस्थाही खराब झाली होती, पण हार्दिक पांड्याच्या वादळी खेळीमुळे भारताला 20 ओव्हरमध्ये 175 रनपर्यंत मजल मारता आली. हार्दिकने 28 बॉलमध्ये 210.71 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 59 रन केल्या, यात 4 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता.
advertisement
3/7
हार्दिक पांड्याशिवाय तिलक वर्माने 26 आणि अक्षर पटेलने 23 रन केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर सिपामलाने 2 आणि डोनोवन फरेराने 1 विकेट घेतली. या विजयासोबतच टीम इंडियाने 5 मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.
advertisement
4/7
भारतात होणारा टी-20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. त्याआधी आता टीम इंडियाच्या 9 मॅच होणार आहेत, यातल्या 4 मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि 5 मॅच न्यूझीलंडविरुद्ध होतील. वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने या मॅच अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
advertisement
5/7
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या टी-20 सीरिजमधून हार्दिक पांड्याचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे. आशिया कपच्या फायनलआधी हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजलाही मुकला होता.
advertisement
6/7
टी-20 वर्ल्ड कपला आता फक्त दोन महिने शिल्लक असताना हार्दिक पांड्याचं फिट होणं आणि आक्रमक बॅटिंग करणं टीम इंडियासाठी दिलासा म्हणावं लागेल. याआधी 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही हार्दिक पांड्याने टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात मोलाचं योगदान दिलं होतं.
advertisement
7/7
2011 चा वनडे वर्ल्ड कप भारतात झाला होता तेव्हा युवराज सिंग भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये युवराजने उल्लेखनीय कामगिरी केली होती. आता पुन्हा एकदा भारतात वर्ल्ड कप होत असल्यामुळे हार्दिक पांड्या या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा एक्स फॅक्टर ठरू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : टीम इंडियाला वर्ल्ड कपसाठी सापडला 'एक्स फॅक्टर', युवीसारखाच भारताला करणार वर्ल्ड चॅम्पियन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल