IND vs SA 2nd T20 : सूर्याची साडेसाती संपली, टीम इंडियाने अखेर टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मुल्लानपूर येथे दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला आहे.
advertisement
1/7

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसरा टी-20 सामना चंडीगढच्या मुल्लानपूर स्टेडियममध्ये होत आहे. मुल्लानपूरमध्ये होणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे, याआधी आयपीएलचे पंजाब किंग्सचे सामने या मैदानात खेळवले गेले.
advertisement
2/7
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
advertisement
3/7
टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर शुभमन गिलचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. मागच्या 16 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये गिलला एकदाही अर्धशतक करता आलेलं नाही, त्यामुळे त्याच्यावरचा तणाव वाढला आहे. पहिल्या टी-20 मॅचमध्ये गिल 2 बॉलमध्ये 4 रन करून माघारी परतला.
advertisement
4/7
दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही टेन्शन वाढवलं आहे. सूर्यकुमार यादवला मागच्या 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फक्त एकदाच अर्धशतक करता आलं आहे. मागच्या सामन्यात सूर्यकुमार यादव 12 रन करून आऊट झाला.
advertisement
5/7
पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 101 रनने विजय झाला असला, तरीही बॅटिंमध्ये हार्दिक पांड्या वगळता कुणालाच मोठी धावसंख्या करता आली नाही. दुसरीकडे सगळ्याच बॉलरनी मात्र उत्कृष्ट कामगिरी केली, त्यामुळे या सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे.
advertisement
6/7
टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचे फक्त 9 सामने शिल्लक आहेत, यातले 4 सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि उरलेले 5 सामने न्यूझीलंडविरुद्ध होणार आहेत. या 9 सामन्यांमध्ये गिल आणि सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये येणं टीम इंडियासाठी गरजेचं आहे.
advertisement
7/7
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA 2nd T20 : सूर्याची साडेसाती संपली, टीम इंडियाने अखेर टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण?