Numerology: दिनांक 8, 17, 26 या जन्मतारखा असणाऱ्यांना घबाड! नवीन वर्ष 2026 मध्ये इतक्या लाभाच्या गोष्टी नशिबी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mulank 8 New Year Horoscope 2026: नवीन वर्ष 2026 हे ग्रहांचा राजा सूर्याचं असणार आहे, कारण अंक ज्योतिषानुसार 2026 ची एकूण बेरीज 1 येते आणि त्याचे स्वामी ग्रह सूर्य आहेत. सूर्य हे पिता आहेत आणि शनि देव त्यांचे पुत्र आहेत. शनीचा अंक 8 आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 8 असतो. सूर्य आणि शनीमध्ये पटत नाही; पिता-पुत्र असूनही दोघांमध्ये शत्रुत्वाची भावना आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्ष 2026 मूलांक 8 च्या लोकांसाठी कसं असेल? नवीन वर्षात मूलांक 8 च्या लोकांना संकटातून मुक्ती मिळेल की त्यांचे आरोग्य बिघडेल? चला जाणून घेऊया नवीन वर्षासाठी मूलांक 8 चे भविष्य सविस्तरपणे.
advertisement
1/6

मूलांक 8 साठी नवीन वर्ष कसं राहील? नवीन वर्ष मूलांक 8 च्या लोकांसाठी आव्हानात्मक असणार आहे. काही गोष्टी तुमच्यासाठी सुखदायक नसतील. मात्र, मूलांक 8 चे देवता शनी महाराज असल्याने, हे लोक आपल्या कठोर परिश्रमाने बिकट परिस्थितीतही यशाचा मार्ग शोधून काढतात. नवीन वर्षात मूलांक 8 च्या लोकांना सावधगिरीने काम करावं लागेल.
advertisement
2/6
परीक्षांमध्ये मिळेल मोठं यश - जे लोक शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा देत आहेत, त्या लोकांना आपल्या कामावर आणि अभ्यासावर जास्त लक्ष देण्याची गरज पडेल. निष्काळजीपणा केल्यास तुम्हाला यश मिळणं कठीण आहे. नवीन वर्ष तुमच्याकडून कठोर परिश्रम करून घेणार आहे. परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न अपूर्ण राहू शकतं, कारण तुमच्या मार्गात अनेक समस्या येऊ शकतात. तरीसुद्धा, नवीन वर्षात तुम्ही परीक्षांमध्ये मोठं यश मिळवू शकता. आपल्या मार्गापासून विचलित होऊ नका.
advertisement
3/6
नवीन वर्षात नवीन काम सुरू न केल्यास बरं होईल. जर तुम्हाला कोणतंही नवीन काम करायचं असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर ते या वर्षी टाळलेलं चांगलं आहे. तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसेल, तरच त्या परिस्थितीत आपल्या योजनेवर पुढे जा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यशासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. काम सहजासहजी होणार नाही.
advertisement
4/6
करिअरमध्ये सावध रहा! मूलांक 8 च्या लोकांनी नवीन वर्षात आपल्या करिअरबद्दल सतर्क राहावं. या वर्षी तुम्हाला तुमच्या बॉसकडून नाराजीचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला सल्ला आहे की, तुम्ही आपलं काम प्रामाणिकपणे आणि पूर्ण मेहनतीने करा. कोणत्याही गोष्टीवर मतभेद झाल्यास, ते योग्य प्रकारे मांडा, वादविवाद अजिबात करू नका. वाद तुमच्यासाठी योग्य नाहीत. सरकार किंवा सरकारी कामांमध्ये अडथळे येऊ शकतात.
advertisement
5/6
पद-प्रतिष्ठा वाढेल, विवाहाचा योग नवीन वर्ष मूलांक 8 साठी कठीण असू शकतं, तरीही तुमचं पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. नवीन वर्षात तुमच्या घरी शुभ कार्याचं आयोजन होईल. घरात कोणाचं लग्न होऊ शकतं. नवीन वर्षात वादविवाद आणि भांडण टाळा मूलांक 8 च्या लोकांना नवीन वर्षात कोणाशीही वादविवाद किंवा भांडण करायचं नाहीये. जर तुम्ही वादविवाद किंवा भांडण केलं, तर ते तुमच्यासाठी अशुभ फलदायी ठरू शकतं. यामुळे तुमचंच नुकसान होऊ शकतं. खासकरून कुटुंबात होणाऱ्या विवादांपासून स्वतःला दूर ठेवा. घरात कोणाशी मतभेद झाल्यास त्यांच्यापासून अंतर ठेवा, भांडणं टाळा. नवीन वर्षात वडिलांशी असलेले संबंध चांगले ठेवा. बोलण्यावर संयम ठेवा आणि इतरांचं बोलणं धीराने ऐका. कोणालाही लगेच प्रतिक्रिया देणं टाळा.
advertisement
6/6
भावनांवर नियंत्रण ठेवा 2026 मध्ये मूलांक 8 च्या लोकांना, त्यातही विशेषत: 26 तारखेला जन्मलेल्या लोकांना, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल. अन्यथा, तुमची मानसिक शांती भंग होऊ शकते आणि तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. नवीन वर्षात मूलांक 8 साठी उपाय मूलांक 8 चे स्वामी शनी महाराज आहेत. तुम्ही नवीन वर्षात संकटमोचन हनुमानाची पूजा करा. सुंदरकांड आणि हनुमान चालीसाचं पठण करू शकता. हनुमान तुम्हाला संकटातून वाचवेल. जेव्हाही तुम्हाला वाटेल की तुम्ही संकटात सापडले आहात, कामात यश मिळणं कठीण आहे, रोगांनी त्रस्त आहात, तेव्हा तुम्ही हनुमानाचे स्मरण करा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: दिनांक 8, 17, 26 या जन्मतारखा असणाऱ्यांना घबाड! नवीन वर्ष 2026 मध्ये इतक्या लाभाच्या गोष्टी नशिबी