IND vs SA : संजू सॅमसनला खेळवा, या खेळाडूला बाहेर बसवा, दुसऱ्या टी20 सामन्याआधी अश्विनच्या विधानाने खळबळ
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसरा टी20 सामना हा न्यु चंदीगडच्या मुल्लानपूरमध्ये खेळवला जाणार आहे.या सामन्याआधी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर रविचंद्रन अश्विनने केलेल्या विधानाने एकच खळबळ माजली आहे.
advertisement
1/6

2/6
आर.अश्विनने संजू सॅमसनला खेळवण्याची मागणी केली आहे. खरं तर संजू सॅमसनला पहिल्या टी20 सामन्यात संधी मिळाली नव्हती. त्याच्या जागी जितेश शर्माला संघात संधी देण्यात आली होती.
advertisement
3/6
दरम्यान संजूला संघात संधी न दिल्या गेल्यामुळे टीम मॅनेजमेंटवर प्रचंट टीका झाली होती. त्यातच आता आर.अश्विनने संजू सॅमसनला संधी देण्याची मागणी केली आहे.तसेच त्याला तिसऱ्या स्थानी खेळवा, प्रामुख्याने स्पिन विरूद्ध, असं अश्विन त्याच्या यु ट्यूब चॅनलवर बोलत होता.
advertisement
4/6
संजू सॅमसनला तिसऱ्या स्थानी खेळवले पाहिजे,असे रविचंद्रन अश्विन म्हणाला.पण तिसऱ्या स्थानी सुर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा फलंदाजीला येतो. त्यामुळे जर संजू तिसऱ्या स्थानावर आला तर या दोघांपैकी तिलक वर्माचाच पत्ता कट होऊ शकतो आणि सूर्यकुमार यादव कर्णधार आहे.
advertisement
5/6
हार्दिक पांड्याच्या खेळी देखील अश्विनने कौतुक केले आहे. हार्दिक पांड्याला आशिया कपमध्ये दुखापत झाली होती. आता तो तब्बल अनेक महिन्यांनी मैदानात उतरला आहे.
advertisement
6/6
हार्दिकने पहिल्या टी20 सामन्यात 59 धावांनी अर्धशतकीय खेळी केली होती.त्याचसोबत त्याने एक विकेट घेतली होती. त्यामुळे हार्दिककडे पाहून तो दुखापतीनंतर परत आलाय असं वाटत नसल्याचं अश्विनने सांगितले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : संजू सॅमसनला खेळवा, या खेळाडूला बाहेर बसवा, दुसऱ्या टी20 सामन्याआधी अश्विनच्या विधानाने खळबळ