TRENDING:

IND vs SA : गंभीरचा अजब न्याय! हरवलं बॅटिंगने, पण बॉलरना बाहेर काढणार... दुसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये 2 बदल होणार!

Last Updated:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी टेस्ट मॅच 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. गुवाहाटीची खेळपट्टी ही सहसा फास्ट बॉलिंगला मदत करते, ज्यामुळे टीम इंडियाच्या निवडीवर परिणाम होऊ शकतो.
advertisement
1/6
गंभीरचा अजब न्याय! हरवलं बॅटिंगने; पण बॉलरना बाहेर काढणार, टीममध्ये 2 बदल होणार!
इडन गार्डनवर झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव करून 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिला सामना जिंकल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सीरिज गमावण्याची भीती नाही, तर दुसरीकडे सीरिज वाचवण्यासाठी भारताला गुवाहाटीमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.
advertisement
2/6
दुसरी टेस्ट मॅच 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीमध्ये सुरू होईल. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमची खेळपट्टी फास्ट बॉलिंगला मदत करते, त्यामुळे भारतीय टीममध्ये बदल होण्याची शक्यता आहे. टीममधला एक स्पिनर वगळून फास्ट बॉलरला संधी मिळू शकते.
advertisement
3/6
टीम इंडियासाठी सगळ्यात मोठी चिंता कर्णधार शुभमन गिलची दुखापत आहे. गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला, तरी भारतीय टीम मॅनेजमेंट त्याच्याबद्दल कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. गिल खेळू शकला नाही, तर त्याच्याऐवजी एक बॅटर प्लेइंग इलेव्हनमध्ये येईल.
advertisement
4/6
शुभमन गिल फिट झाला नाही तर साई सुदर्शनला संधी मिळू शकते. सुदर्शन टीममध्ये आला तर तो तिसऱ्या आणि वॉशिंग्टन सुंदर चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करू शकतो.
advertisement
5/6
दुसरीकडे कुलदीप यादवला वगळून फास्ट बॉलर आकाश दीपला संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे तिघंही स्पिन बॉलिंग मजबूत करण्याशिवाय बॅटिंगमध्येही योगदान देतात.
advertisement
6/6
दुसऱ्या टेस्टसाठी भारताची संभाव्य टीम : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : गंभीरचा अजब न्याय! हरवलं बॅटिंगने, पण बॉलरना बाहेर काढणार... दुसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये 2 बदल होणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल