IND vs SA : ज्याने सूर्याला रडवलं त्यालाच हार्दिक मारणार मिठी, 90 मिनिटं मिळवून देणार कोट्यवधी रुपये!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs SA Quinton de Kock : साऊथ अफ्रिकेचा ओपनर क्विंटन डी कॉकला त्याच्या आक्रमक खेळीसाठी मॅचचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. अशातच कालची खेळी त्याला कोट्यावधी रुपये मिळवून देऊ शकते.
advertisement
1/7

नवी चंदीगढ येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाला दुसऱ्या T20 मॅच मध्ये दक्षिण आफ्रिका कडून 51 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. याला कारण ठरला क्विंटन डी कॉक...
advertisement
2/7
क्विंटन डी कॉकच्या वादळी 90 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने 4 गडी गमावून 213 धावांचा डोंगर उभा केला, ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ पूर्णपणे गडगडला.
advertisement
3/7
क्विंटन डी कॉकने केवळ 46 बॉलमध्ये 5 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीने 90 धावांची तडाखेबाज खेळी साकारली. त्याच्या 90 धावांमुळे टीम इंडियाचं गणित फिसकटलं.
advertisement
4/7
क्विंटन डी कॉक काल मैदानात तब्बल 90 मिनिटं खेळला. पण हीच 90 मिनिटं त्याला कोट्यावधी मिळवून देणार आहेत. क्विंटन डी कॉकने आयपीएल लिलावासाठी नोंदणी केली आहे.
advertisement
5/7
क्विंटन डी कॉक याला संघात घेण्यासाठी अनेक संघाच चढाओढ दिसून येऊ शकते. LSG ने त्याला रिलीज केल्यानंतर आता तो कोणत्या फ्रँचायझीकडून खेळणार? यावर अनेक प्रश्नचिन्ह आहेत.
advertisement
6/7
क्विंटन डी कॉक यंदाच्या हंगामात आयपीएल खेळणार नव्हता. पण कोणत्यातरी एका फ्रँचायझीने त्याला नाव नोंदणी करायला सांगितलं अन् संघात घेण्यावर रस दाखवला होता. अशातच 90 मिनिटांची इनिंग त्याला मालामाल करू शकते.
advertisement
7/7
दरम्यान, मुंबई इंडियन्सला सध्या रोहित शर्मासोबत लेफ्ट हँडर सलामीवीराची गरज आहे. त्यामुळे सूर्याला रडवणाऱ्या क्विंटन डी कॉकला हार्दिक पांड्या मिठी मारणार का? असा सवाल विचारला जातोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : ज्याने सूर्याला रडवलं त्यालाच हार्दिक मारणार मिठी, 90 मिनिटं मिळवून देणार कोट्यवधी रुपये!