T20 World Cup 2026 : सेमीफायनलला नाही पण फायनलमध्ये IND vs PAK मॅच होणार? थोडक्यात समजून घ्या समीकरण!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs PAK T20 World Cup 2026 Final Scenario : जर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्स फायनलमध्ये एकमेकांशी भिडल्या, तर तो या स्पर्धेतील सर्वात रोमांचक मुकाबला ठरेल. सध्या दोन्ही टीम्सनी सेमीफायनलमध्ये जागा मिळवलेली नाही, तरीही त्या रेसमध्ये कायम आहेत.
advertisement
1/6

भारत आणि पाकिस्तान मॅच म्हटलं की, चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळतो. T20 वर्ल्ड कप 2026 च्या ग्रुप स्टेजमध्ये या दोन्ही टीम्स आमनेसामने आल्या होत्या, जिथं टीम इंडियाने विजय मिळवला होता.
advertisement
2/6
मात्र, सुपर-8 मध्ये या दोन्ही टीम्स वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असल्याने त्यांची गाठ पडू शकली नाही. आता पुन्हा एकदा या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये फायनल मॅच होऊ शकते का, असा प्रश्न आता सर्वांना पडू लागलाय.
advertisement
3/6
जर या दोन्ही टीम्स आपापल्या ग्रुपमधून मॅच जिंकत सेमीफायनल जिंकल्या, तर फायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय-व्होल्टेज ड्रामा चाहत्यांना पाहायला मिळू शकतो.
advertisement
4/6
टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये क्वालिफाय करण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्धची मॅच जिंकणं गरजेचं आहे. जर असं झालं, तर ते टॉप-4 मध्ये आपलं स्थान निश्चित करतील आणि टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामना होईल.
advertisement
5/6
समीकरणानुसार, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आपापल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यता जास्त आहे. नियमांनुसार, पहिल्या ग्रुपमधील टॉपर आणि दुसऱ्या ग्रुपमधील दुसऱ्या क्रमांकाची टीम यांच्यात सेमीफायनल होते.
advertisement
6/6
दरम्यान, सेमीफायनलमध्ये जर टीम इंडियाने इंग्लंडला हरवलं अन् पाकिस्तानने साऊथ अफ्रिकेचा पराभव केला तरच भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा फायनलचा सामना पहायला मिळू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup 2026 : सेमीफायनलला नाही पण फायनलमध्ये IND vs PAK मॅच होणार? थोडक्यात समजून घ्या समीकरण!